आदिवासी कातकरी समाजाचे दत्तू हिलम यांनी याबाबत तहसीलदार ,गटविकास अधिकारी,पोलीस स्टेशन,शहापूर,वाफे ग्रामपंचायत यांना पत्र देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे,सदर निवेदनात म्हंटले आहे की तहसीलदार शहापूर यांनी वाफे ग्रामपंचायत हद्दीत दिनांक २३:६:१९७९ रोजी दत्तू हिलम,त्यांचे वडील लहानु हिलम,तसेच भाऊ चिमा हिलम,बबन हिलम,बाळू हिलम याना प्रत्येकी 30×30 चौ, फूट जागा घर बांधण्यासाठी दिली होती,कालांतराने या ठिकाणची घरे पडल्याने मजुरी करणारे हिलम कुटुंब त्यावर घरे बांधू शकले नाहीत,
मात्र याचाच गैरफायदा घेऊन ग्रामपंचायत वाफे तर्फे तेथेच घरकुले बांधून हिलम कुटुंबातील प्लॉट वर अतिक्रमण केले आहे,याबाबत त्यांनी वेळोवेळी तक्रार करूनही योग्य कागदपत्रे नसल्याने व तलाठी कार्यालयात तुम्हाला दिलेल्या प्लॉटची नोंदच नसल्याचे सांगून त्यांची दखलच घेण्यात आली नाही, मात्र दत्तू हिलम यांचा पुतण्या सनी हिलम याने तहसीलदार शहापूर यांच्याकडून प्लॉट दिल्याची नोंद असल्याचा फेरफार सादर करूनही ग्रामपंचायत वाफे दखल घेत नसल्याने दत्तू हिलम यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांसह तहसीलदार कार्यालय शहापूर यांच्यासमोर सोमवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे,विशेष म्हणजे दत्तू हिलम हे याच ग्रामपंचायतचे सदस्य असूनही न्याय मिळण्यासाठी त्यांना उपोषण करावे लागत आहे,
0 टिप्पण्या