देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजही "करो या मरो" ची गरज ! - डॉ सुनिलम

  ठाणे  - ९ ऑगस्ट १९४२ रोजी "ब्रिटिश साम्राज्य चले जावं" हा नारा देऊन महात्मा गांधींनी भारतीय लोकांना स्वातंत्र्यासाठी "करा किंवा मरो" आवाहन केले होते. काँग्रेसचे सर्व नेते तुरुंगात कैद केले गेले तेंव्हा लोकांनी पुढे येऊन आंदोलन सुरू ठेवले. स्वातंत्र्य चळवळींमध्ये सर्वात मोठे हे आंदोलन होते. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते देशाचा सर्व ऐतिहासिक वारसा कॉर्पोरेट कंपन्यांना विकत आहेत. खाजगीकरणाच्या माध्यमातून, अदानी अंबानी सारख्या भांडवलदारांना प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन देऊन, शेतकरी आणि मजुरांवर अत्याचार करणारे कायदे करून, ते अन्यायकारक आर्थिक आणि सामाजिक स्थिती निर्माण करत आहेत.  पाणी, जंगल, जमीन, सरकारी संस्था, रेल्वे, बँका, एलआयसी. अदानी अंबानींना विकले जात आहे. देशात धार्मिक कट्टरतावाद पसरवून अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य केले जात आहे. सेंट्रल व्हिस्टाच्या नावाने देशाच्या वारशाचे नाव मिटवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. अशा परिस्थितीत सुनीलम यांनी सर्व सामाजिक, राजकीय चळवळीतील आणि जनांदोलन चळवळींतील कार्यकर्त्यांनी आणि जनतेने स्वातंत्र्य वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी पुढे येऊन लढा उभा करण्याचे आवाहन केले. ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजित संवाद सभेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. 

  NAPM च्या नेतृत्वाखाली देशभर २५० अधिक ठिकाणी विविध संघटनांनी क्रांती दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करत पुढील वर्षभर लोकांच्या स्वातंत्र्य आणि हक्कांच्या संवर्धनासाठी सामूहिक मोहीम राबवण्याची आली. ठाण्यातील विविध संघटनांच्या जन आंदोलन अभियानच्या वतीने आज संवाद सभेने सुरुवात झाली आहे. सभेच्या सुरुवातीला महात्मा गांधी गार्डनमध्ये असलेल्या हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून सभेची सुरुवात करण्यात आली. येत्या वर्षी देश ७५ वे स्वातंत्र्य साजरे करणार आहे, त्या निमित्ताने आजच्या बिकट परिस्थितीत जनते समोर कार्पोरेट संकट आहे, तसेच केंद्र सरकारने अलोकतांत्रिक पध्दतीने लादलेले ३शेती कायदे, ४ कामगार संहिता, विज बिल, नवीन शैक्षणिक धोरण तसेच वाढती बेरोजगारी, आरोग्य समस्या,स्त्रियां - युवांचे प्रश्नांबाबतीत भूमिका मांडून सरकारचे खोटारडेपणाचे भांडाफोड करण्यासाठी वर्षभरात किमान 

या वेळी अजय भोसले यांनी बेरोजगारी, टी. ललिता महिलांची स्थिती, धोंडीराम खराटे आरोग्य यंत्रणा, चंद्रभान आझाद संविधानाचे मूल्य, गिरीश भावे यांनी सरकारने लादलेले जाचक कायदे उघड केले. एड. लक्ष्मी छाया पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुक्ता श्रीवास्तव यांनी क्रांती गीत गायले. प्रस्तावना भास्कर गव्हाळे यांनी मांडली. मनीषा जोशी यांनी कार्यक्रमात सर्वांना प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष बागवे यांनी केले. जगदीश खैरालिया यांनी डॉ सुनीलम यांची ओळख करून दिली आणि शेवटी हर्षलता कदम यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA