अधिक तपासामध्ये आरोपींनी राधा गिरीधारी मंदिर, पाससिक हिल, सीबीडी येथील मुर्तीचे चांदिचा मुकूट व दानपेटीतील रोख रक्कम) , विठ्ठल रूखमाई मंदिर, खारकोपर येथील मुतीचे सोन्याचे दागिणे व चांदिच्या पादुका), (बालाजी मंदिर, नेरूळ येथील दानपेटी फोडून रोख रक्कम), (चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, मुंबइ -अहमदाबाद हायवे, सातीवली, पालघर येथील मुर्ती) नवी मुंबई, पालघर येथिल वेगवेगळया मंदिरांमध्ये चोरी केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हयातील चोरी केलेले देवदेवतांचे चादिचे मुकूट, पादुका इत्यादी असे सुमारे २ किलो ३५७० ग्रॅम वजनाची चांदी हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच अधिक तपासामध्ये नमुद आरोपी व त्यांचे साथीदारांनी नवी मुंबई परीसरातून पार्क केलेल्या वाहनांच्या २४ बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या असून एकुण त्याचेकडून सुमारे ३,२५७,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरचे आरोपी हे घरफोडी चोरी करण्यात सराईत असून आरोपी सुभाष शितलाप्रसाद केवट, याचेविरूध्द यापुर्वी मंदिरातील व इतर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.सदरची उल्लेखनीय कामगिरी मध्यवती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, सहा. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर, जी.डी. देवडे, व पोलीस अमलदार नितीन जगताप, सतीश सरफरे, आतिष कदम, लक्ष्मण कोपरकर, अजय कदम, राहुल वाघ, व विजय खरटमोल यांनी केलेली आहे.

0 टिप्पण्या