पूरग्रस्त सलुन ब्युटीपार्लर व्यावसायिकांना मदतीचा हात

 

       कोकणात जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे चिपळूण,खेड, महाड परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सलुन ब्युटी पार्लर व्यावसायिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले त्यांची दुकानेच्या दुकाने वाहून गेली त्या अनुषंगाने सलुन ब्युटी पार्लर असोसिएशन तर्फे एक पाहणी दौरा करून मदत करण्याचे निश्चित करण्यात आले. सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या शाखा शाखांनी आपापल्या परीने सढळ हस्ते भरघोस मदत केली. ठाणे जिल्हा अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे देखील ठाणे शाखेतर्फे सलून ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्रला 31000/- चेक देण्यात आला सदर मदत कार्य महाराष्ट्र प्रभारी उदय जी टक्के यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिपक यादव व तुषारजी चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली ओलिविया,स्ट्रीक्स, ब्युटी शेफ, स्किन अमोर, असबाह या कंपन्यांनी देखील प्रॉडक्ट च्या स्वरूपात भरपूर मदत केली. कांजूर आणि मुलुंड शाखेकडून सलून कीट बनवून देण्यात आले. तसेच घाटकोपर शाखा, दहिसर शाखा, नॅशनल अकॅडमी आणि यु टक्केज् अकॅडमी यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला.

जमा झालेली सगळी मदत एकत्र करून 16 ऑगस्ट 2019 रोजी चिपळूण, खेड, बिरवाडी, महाड या भागातील सलुन ब्युटी पार्लर व्यावसायिकांना या मदतीचे वाटप करण्यात आले. या मदत कार्यासाठी महाराष्ट्र कमिटीकडून संस्थापक अध्यक्ष श्री.दत्तात्रेय चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी श्री. उदय टक्के, जनरल सेक्रेटरी किसनराव कोराळे, सचिव  दीपक यादव ,उपाध्यक्ष तुषार चव्हाण, कार्याध्यक्ष  निलेश रणदिवे, मुंबई सचिव सचिन टक्के, ठाणे शाखेकडून सचिव श्री.मंदार राऊत,संपर्क प्रमुख संदीप जाधव, समन्वयक अरुण चव्हाण व प्रतिक पवार.तर मुलुंड शाखेकडून मुंबई सहसचिव संदीप चव्हाण, संतोष ठाकूर श्री विशाल कदम ,निजाम भाई आणि जाफर भाई, भांडुप शाखेकडून मुंबई उपाध्यक्ष संदीप बदिरके,अभय चव्हाण यांची उपस्थिती होती. अशी माहिती किसनराव कोराळे जनरल सेक्रेटरी यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या