हॉटेल, रेस्तरॉ, मॉल्संना रात्री 10 वाजपेर्यंत परवानगी, मात्र लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश

  मुंबई- राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट मालक आणि चालकांकडून वेळा वाढवून देण्याची मागणी केली सातत्याने करण्यात येत होती. या मागणीवर विचार करीत राज्य शासनाने दिलेल्या निर्णयानुसार 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तरॉ, मॉल्स देखील रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार अशीही माहिती देण्यात आली आहे.  सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे.  आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत होते. 

 'आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता. त्या निर्बंध कमी करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता दिलेली आहे. यानुसार आता 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. यासोबतच महत्त्वाचे म्हणजे लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे 14 दिवस झालेले असणे आवश्यक असणार आहे. असे असेल त्यांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी असणार आहे.' अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. दरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे प्रतिपादन राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉरटस असोसिएशन - आहार तसेच हॉटेल औंनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केले होते. याबाबत आज त्यांनी मंत्रीमंडळात निर्णय घेण्यात आला.

उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याल जास्तीत जास्त २०० संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये ५० टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा १०० या पेक्षा जास्त नाही. इनडोअर स्पोर्ट्समधील खेळाडू व तेथील कर्मचारी, व्यवस्थापन यांचे देखील लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असतील तर, जे काही इनडोअर स्पोर्ट्स आहे त्यामध्ये मग बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी सर्व खेळांना परवानगी दिली गेली आहे. शॉपिंग मॉल्स पूर्ण आठवडाभर १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास हरकत नाही, अशी मान्यता दिली गेली आहे. परंतु त्यामध्ये जाणारे जे ग्राहक आहेत, त्यांनी डबल डोस घेतलेला असण्याची आवश्यकता आहे आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केलेल असण्याची आवश्यकता आहे. तसं सर्टिफिकेट दाखवणाऱ्यांना मॉलमध्ये जाण्यास कुठलीही अडचण नाही.

शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी या सगळ्यांना प्राधान्याने कोविड लस देण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं आहे आणि असंही सांगितलं आहे की, खासगी औद्योगिक व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांचे ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, अशा आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जी खासगी कार्यालयं आहेत, त्या ठिकाणी २४ तास खासगी कार्यालयं सुरू राहू शकतील, हा एक महत्वपूर्ण निर्णय़ आहे. कारण एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा या खासगी कार्यलायांनी त्यांच्या गरजे प्रमाणे एका सत्रात २५ टक्क्यांपर्यंत उपस्थिती ठेवली तर, आपल्याला खासगी कार्यालयं सुरू ठेवता येतील, अशी सूचना करण्यात आलेली आहे. सर्व दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या