जातीय राजकारणाबाबत जाहिर चर्चा होण्याची शक्‍यता

 एका टिं.व्ही.चॅनेलवरील संवादा दरम्यान मनसे प्रमुख यांनी राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाल्याचे वक्‍तव्य करत गेल्या काही वर्षात जातींच्या आधारावर राजकारणात वाढ झाल्याचे वक्‍तव्य केले होते मागील काही वर्षात राज्यातील जातीय संघर्ष आणि आरक्षणाच्या प्रश्नी विविध समाजाकडून काढण्यात येत असलेल्या मोर्चे, निदर्शनांच्या धर्तीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वक्‍तव्य केले. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे पहिल्यांदाच जातीय राजकारणाबाबत पहिल्यांदाच जाहिर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. तसेच यासंदर्भात एखाद्या राजकिय पक्षाला जबाबदार ठरविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध असतानाही राज ठाकरे यांनी वक्तव्य केले याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी  काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले,  राष्ट्रवादी काँग्रेस शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करत्तो. मात्र  राजं ठाकरे यांना हे माहीत नसावे किंता जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून तें अशाप्रकारचे वक्‍तव्य करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.   या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळें  जातींआंधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राजं ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे असा उपरोधिक टोला लगावत ते म्हणाले की, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे. राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्‍तव्य केले असावे असा आरोपही त्यांनी केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA