सर्वसमावेशक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचित, १ खजिनदार आदींसह महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारणी सदस्य आणि १४ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारणीवर जवळपास सर्वच गटाच्या नेते-कार्यकर्त्यांना प्राधान्य देत काँग्रेसमध्ये कोणताही गट नाराज राहणार नाहीं याची काळजी काँग्रेस श्रेष्टींनी घेतल्याचे उपलब्ध यादीवरून दिसत आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारणीत कोणा कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती.  त्यानुसार आज काँग्रेसच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारणीतील नावांना मंजूरी दिली असून यासंबधीची यादीही जाहीर केली. 

उपाध्यक्षांच्या यादीत काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव समावेश आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नी चालवतील हे स्पष्ट आहे.  शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.  कार्यकारणी सोबतच 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीदेखील काँग्रेसने जाहीर केलेल्या आहेत. धवलसिंह मोहिते पाटील सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तर विक्रम सिंह सावंत सांगली ग्रामीणचे अध्यक्ष असणार आहेत. 

मुंबईतील स्व.गुरूदास कामत गटाचे डॉ.अमरजींत मनहास यांना राज्याच्या खजिनदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आलीं आहे. तर याच गटाचे झाकिर अहमद यांची जनरल सेक्रेटरी पदी वर्णी लावण्यात आली आहे. ठाणे ग्रामीणच्या अध्यक्षपदी दयानंद चोरगे, भिवंडीच्या शहराध्यक्ष पदी रशिद मोमीन, रायगडच्या अध्यक्षपदी महेंद्र घरत,  उल्हासनगरच्या अध्यक्ष पदी रोहित साळवे, सोलापुर ग्रामींणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले माजी खासदार स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे चिरेजीत धवलसिंग मोहिते-पाटील पांच्यातर सोपदिण्पात आलीं आहे. सांगली ग्रामीणच्या अध्यक्षपदी विक्रमसिंह सावंत, जव्ठगांव शहर अध्यक्ष पदी श्यामकांत तायडे, वाशिम अध्यक्ष पदी अमित झनक, अकोला  ग्रामीणच्या अध्यक्षपदी अशोक अमनकर, बीडच्या अध्यक्ष पदी राजेसाहेब देशमुख, बुलढाण्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार राहुल बोंद्रे यांच्याकडे, पुणे शहराच्या अध्पक्ष पदी स्मेश बागवे यांच्याकडे, मीरा भाईदरच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रमोद सामंत आणि सिंधुदुर्ग अध्यक्ष पदी चंद्रकांत गावडे यांची निवठ करण्यात आली आहे. तर प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्ते पदी अनंत गाडगीळ, राजू वाघमारे, सचिन सावंत, अतुल लोंढे, डॉ.संजय लाखे-पाटील, उत्कर्ष रूपये  यांची पुन्हा निवड करण्यात आलीं आहे.

नव्या प्रदेश काँग्रेस कमिटीत जातींचं संतुलन प्रकर्षाने साधल्याची प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. 190 जणांच्या प्रदेश कमिटीत  मराठा-43, मुस्लिम 28,  ब्राह्मण 11, ओबीसी 11, एस सी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4 मातंग 4  अशा पद्धतीने वेगवेगळ्या जातींना स्थान देण्यात आलं आहे.. शिवाय प्रादेशिक संतुलनाचा ही विचार करण्यात आला आहे.  महिलांचे प्रतिनिधित्व मात्र तुलनेने कमी आहे 190 जणांच्या कमिटीमध्ये केवळ 17 महिला आहेत. हे प्रमाण नऊ टक्क्यांच्या आसपास आहे. 190 जणांच्या प्रदेश कमिटीत 30-40 या वयोगटातील 17, 41-50 या वयोगटातील 62, 51-60  या वयोगटातील 78, 61-70  या वयोगटातील 32 तर 70 पेक्षा अधिक वय असणारी एक व्यक्ती आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA