ठाणे शहर काॅग्रेस ब्लाॅक क्रमांक 8च्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण

   ठाणे: येत्या काही महिन्यांतच येणा-या ठाणे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पूर्ण शक्तीनिशी स्वबळावर लढणार असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागले पाहीजे असे वक्तव्य ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीत केले. ठाणे शहर काॅग्रेसच्या ब्लाॅक क्रमांक 8 च्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वितरण समारंभाचे आयोजन शहर काॅग्रेस ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिदे यांनी केले होते,याप्रसंगी ठाणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,,माजी नगरसेवक बशीर बापे, जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, शहर काँग्रेस सरचिटणीस रविंद्र कोळी  महेंद्र म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहर ब्लाॅकच्या कार्याध्यक्षपदी अॅड.जावेद शेख व सौ.अर्चना गांगुर्डे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

विक्रांत चव्हाण पुढे म्हणाले,,काँग्रेस पक्षाचे प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत तसेच पारंपारिक मतदारही आहेत पण आपला कार्यकर्ता त्याठिकाणी पोहोचला पाहिजे शहरी भागातून यापूर्वी अनेक काँग्रेसचे नगरसेवक निवडून येत असत परंतु काही वर्षांपासून आपले शहरातील आपले वर्चस्व कमी झाले असली तरि आता आपण शहरातुनही चांगली ताकद उभी केली आहे त्यामुळे येणा-या निवडणुकीत एकसंघ राहाणे गरजेचे आहे. वॉर्डातून काम करेल व त्याच्याच नावाची शिफारस करत असताना स्थानिकांची मतही विचारात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले .

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी सागितले कीपदाधिकाऱ्यांनी आतापासून निवडणूकपूर्व कामाला लागले पाहिजे जी तयारी करायची ती आतापासून करा,निवडणुक लढवित असताना चोहोबाजूंनी विचार करावा,एकमेकांचे हेवेदावे विसरून पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत काम केले तरच प्रत्येकाला संधी मिळेल अशा सूचना केल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या