Top Post Ad

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ?

भारत स्वातंत्र्य होऊन 74 वर्ष पूर्ण झालीत. 75 वर्षात पदार्पण करीत आहोत.प्रबुद्ध भारताचा हिंदुस्थान बनविण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशात प्रचंड असंतोष,अस्वस्थाता आहे. जम्मू काश्मीरचे 370 व 35 ए कलमा मुळे सर्व गंभीर प्रश्न मागे पडले.इ व्ही एम मशीन बाबत निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट निर्भीड, निःपक्षपाती निर्णय घेतांना दिसत नाही. प्रशासकीय यंत्रणा कुठेही प्रामाणिकपणे संविधानाच्या चौकटीत कार्यरथ दिसत नाही. एका बाजूला आपल्याला स्वातंत्र्य आहे.तर दुसऱ्या बाजूला प्रचंड विषमतावादी समाज व्यवस्था जे सांगते ते मान्य करा नाहीतर भर चौकात दहावीस लोक स्मार्टफोन मोबाईलवर व्हिडीओ शूट करून आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून देत आहेत.त्यांना कोणाची भीती वाटत नाही. त्यामुळेच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना मनात एक नाही तर हजारो प्रश्न उभे राहतात.


 आपण आपला देश खरोखरच स्वातंत्र्य झाला आहे काय?. की गोरे गेले आणि काळे शेंडीवाले आले. 15 ऑगस्ट 1947 च्या पूर्वीचे दिवस आता 2021 नंतरच्या दिवसात किती फरक पडला?. तरी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज देशातील खेड्यापाड्यात शेतकरी शेतमजुरांच्या हाती महागडा मोबाईल फोन आहे.पण त्याला चार्जिंग करण्यासाठी चोवीस तास वीज नाही.मोठ्यांना मोठं मोठी घरे आहेत,गरिबांना इंदिरा निवास,रमाई निवास आणि पंतप्रधान आवास योजनेची पक्की घरे आहेत,तरी चारीबाजूने पावसाच्या पाण्यात रास्ते, कुठे आहेत दिसत नाही.देशात अनेक राज्यात पावसाच्या पाण्यामुळे पूरजन्य परिस्थिती आहे.

भारत माझा देश आहे.सर्व भारतीय माझे बांधव आहेत. सर्वांशी मी गुण्यागोविंदाने वागेल ही प्राथमिक, माध्यमिक शाळा कॉलेज मध्ये शिकवली जाणारी प्रतिज्ञा शाळा कॉलेज बाहेर कोणी आचरणात आणतांना दिसत नाही. हेच विद्यार्थी जेव्हा उच्चशिक्षित होऊन अधिकारी कर्मचारी बनतात तेव्हा आर्टिकल 15 कलमाचे खुलेआम उल्हघन करतांना दिसतात. नैसर्गिक संकटात भारतीय नागरिकांत ती कधी कधीच दिसते ती म्हणजे माणुसकी. आज पूरग्रस्त भागात तीच माणुसकी कामाला येतांना दिसत आहे. म्हणून खूप माणसांची जीवित हानी टळली. कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे महाड,खेद,चिपळूण मध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड हाहा कार उडाला आहे.पुरात अडकलेल्या लोकांना सुखरूप काढण्याचे कार्य सुरू आहे. नवसाला पावणारे जागृत देव व देवी स्वतःच्या घरांना वाचवू शकले नाही. या प्रचंड पावसात व पुरात हिंदूंची मंदिरे बुडाली,मुस्लिमांच्या मशिदी बुडाल्या,ख्रिश्चनांच्या चर्च बुडाली, सर्व धर्मियांची देव देवता आणि प्रार्थना स्थळे पाण्यात बुडाली.सर्व नागरिकांनी आपापल्या उपासना पद्धतीने संकट निवारणासाठी प्रार्थना केल्या.पण कोणते ही देव जागृत देवी धावून आले नाही.पण तेच गणवेशातील पोलीस, सुरक्षा दले, सैन्य आणी तुमच्या आमच्या सारखेच माणसच धावून आलीत.त्यामुळे जाती धर्माचा गर्व करण्यापेक्षा माणुसकीचा गर्व करा.असा भारतीय संविधानाने दिलेला संदेश आम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवला पाहिजे.

भारत माझा देश आहे. व सगळे भारतीय माझे बांधव हीच भावना नेहमी मनात असायला पाहीजे.ती घरात दारात किंवा कार्यालयात आचरणात दिसली पाहिजे.तरच भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो.असे गर्वाने सांगता येईल.आणि ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देता येतील.
भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकत नाही. राजे महाराजे,भांडवलदार, सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून लोकप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते.जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे लोकशाहीचे चार खांब न्यायपालिका,लोकसभा, प्रचार प्रसार मध्यम,प्रशासकीय व्यवस्था हया आज तरी पूर्णपणे कोसळलेल्या दिसतात.

आज स्वातंत्र्य म्हणजे काय?. आजच्या पिढीला विचारले तर खा पिया मजा करा फुल एन्जॉय करा कोणीच कोणाला विचारू शकत नाही,हेच खरे स्वातंत्र्य आहे.म्हणूनच आजची मुलंमुली आईवडील, काका,मामा यांचा आदरयुक्त आदर्श ठेवतांना दिसत नाही.कोणालाच कोणाचे बंधन नाही. कोणी कसे ही सैराट वागू देण्याची परवानगी म्हणजे स्वातंत्र्य आहे.कुटुंबातील एकत्र राहण्याची एकमेकांना आधार देणारी एकत्रित कुटुंब पद्धत पूर्णपणे मोडून पडली,जसे कुटुंबातील सर्व सभासद वेगवेगळ्या पद्धतीने आपले जीवन जगतात. तशीच पध्दत नगरानगरात, वॉर्डात, तालुक्यात होत आहे. त्यामुळे कुटुंबात एकमत नाही चारभाऊ चार पक्षात आणि आईवडील वृध्दाश्रमात म्हणे सर्वांना स्वातंत्र्य मिळाले आहे. हीच परिस्थिती देशाची झाली आहे. 

राजकीय पक्षांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. ते जे ७४ वर्षात झाले नाही ते त्यांनी सात वर्ष पूर्ण सत्ता प्रस्थापित केल्या नंतर सातव्या वर्षी करून दाखविले. ते सरकार भारतीय मतदारांनी निवडून दिलेलं सरकार आहे की EVM मशीन ने निवडून दिलेलं सरकार आहे. यावर निर्भीड निःपक्षपाती धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाच्या चौकटीत चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळेच अनेक प्रामाणिक कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी वर्गाने सेवा करण्यास नकार दिला व घरी बसने पसंत केले. या देशातील न्यायाधीशांना पत्रकार परिषदेत आपले दुःख व्यक्त करावे लागते. तर सर्व सामान्य असंघटित कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना, कामगारांना किती अन्याय,अत्याचार सहन करावे लागत असतील यांचा विचार स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्षी आपण नागरिक म्हणून करणार की नाही.
    
आरक्षणामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगणारी प्रभाव शाली यंत्रणा विचारधारा या देशात आहे.एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे गुणवत्ता मोजणारी यंत्रणा व माणसं सर्व मोख्याच्या ठिकाणी बसली असतांना आरक्षण घेणाऱ्यामुळे देशाचे वाटोळे कसे झाले?.विषमतावादी विचारधारा मानणारे अधिकारी, कर्मचारी निर्णयघेणारी यंत्रणा यांची असतांना लाल किल्ला कोणी विकला?.कोणी ?.कोणाला?. किती दिवसासाठी?. कोणत्या कारणासाठी दिला?.यांची साधी चर्चा, बातमी मुख्यपानावर हेडलाईन कोणत्याही वृत्तपत्रांची झाली का?. कोणत्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  द्याव्यात ?.

    भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचा संदेश लाल किल्ला दिल्ली येथून दिला जात होता.आता तो आपला राहिला काय?. स्वतंत्र्य चळवळीची ऐतिहासिक वास्तू लालकिल्ला या बाबत आजच्या पिढीला आम्ही काय माहिती देणार आहोत?. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना मला असे प्रश्न माझ्या मुलांचा, मुलींचा त्यांचा दुसरीत शिकणारा मुलगा विचारतो स्वातंत्र्य दिन का साजरा करतात?. झेंडा वंदन करावे आणि चॉकलेट खावे, सार्वजनिक सुट्टीचा आनंद घ्यावा,चाळीत सोसायटीच्या आवारात सत्यनारायण महापूजा ठेवावी.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात.झाला स्वातंत्र्य दिन ?.

सागर रामभाऊ तायडे,
9920403859,भांडुप मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com