"संतविचार : भारतीय एकात्मतेचा पाया" या विषयावर Online विचार जागर

  विजय सातपुते स्मृतिदिनानिमित्त Online विचार जागर

यंदा २० जुलैला आषाढी एकादशी आहे. २१ जुलैला बकरी ईद आहे. या दोनही दिवसांचं औचित्य साधून जातीधर्मापल्याडचे संत विचार समजून घेऊया. आपल्या देशात हिंदू मुस्लिम ऐक्य हे गंगाजमनी तहजीबीने कायम राखलय. आपल्याला गावागावांतून ही गंगाजमनी तहजीब बघायला मिळते. त्यातूनच निर्माण झालेले सलोख्याचे प्रदेश हे आपल्या देशाच्या एकात्मतेचे मजबूत आधार आहेत. संतविचारांनी याचे सिंचन केले आहे. वर्तमान परिस्थितीत टोकाची असहिष्णुता वाढीस लागलीय. आणि असहिष्णु असणं ही आपली ओळख बनत चाललीय की काय अशी भिती वाटायला लागलीय. अशा परिस्थितीत परत एकदा संतविचारांकडे वळुया आणि भारतीय एकात्मतेचा पाया समजून घेऊया. २० जुलै २०२१ रोजी विजय सातपुते यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही  Onlineच भेट होणार आहे. . विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास करणारा विजय त्याच्या शेवटच्या दिवसांत तुकारामांच्या विचारांचा अभ्यास करत होता. विजयच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त विजयच्या या विचारजागरात आपणही सामिल होऊया. असे आवाहन विजय सातपुते मित्रपरिवारातर्फे करण्यात आले आहे. 

परिवर्तनवादी चळवळीतील प्रबोधन संतविचारांच्या माध्यमातून करणारे "ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर" हे विजय सातपुते स्मृतिदिनानिमित्त "संतविचार : भारतीय एकात्मतेचा पाया" या विषयावर Online विचार जागर करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ पत्रकार सचिन परब हे भूषवणार आहेत. ZOOM च्या माध्यमातून होणाऱ्या या Online विचार जागरात विजय सातपुते मित्रपरिवार मोठ्या संख्येने सामिल होईल. मंगळवार २० जुलैला सायं. ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण सत्यशोधक विजय सातपुते या फेसबुक पेजवरुन करण्यात येईल. आपणही या Online विचार जागरात अवश्य सामिल व्हावे अशी विनंती. साथी सिरत सातपुते ८१४९६७३९२९,मुंबई यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA