कळव्यातील डोंगराच्या अतितीव्र उतारावर असणा-या १२०० हून अधिक अतिक्रमणांवर आता कारवाई होणार आहे. वनविभाग अशी कारवाई करणार असल्याचं सांगितलं जातं. अलिकडेच घोलाईनगर भागात दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पारसिक हिल, इंदिरानगर, ओतकोनेश्वर नगर, भास्करनगर आदी भागातील डोंगर उतारावरील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे. घोलाईनगर मधील दुर्घटनेनंतर वनविभागानं डोंगर उतारावरील घरांचं सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात डोंगर उतारावर १२०० अतिक्रमणं असल्याचं समोर आलं होतं. या अतिक्रमणांना कर कधी लावण्यात आला, पाणी कधी देण्यात आलं, वीज केव्हा दिली गेली याची माहिती वन विभागाकडून गोळा केली जात आहे. डोंगर उतारावर असलेलं हे अतिक्रमण हटवून अतिक्रमण टाळण्यासाठी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा वन विभागाचा विचार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA