अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई, एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल

  दिवा प्रभाग समिती क्षेत्रात रस्ता रूंदीकरणातंर्गत दीवा आगासन रोड येथील बाधित अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. दिवा प्रभाग समितीमधील गणेश नगर दीवा आगासन रोड येथील रस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेल्या गाळाधारक एकनाथ गायकर यांचे दोन गाळे आज जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आलेत. तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अरुण म्हात्रे यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या