दिव्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई : तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहिम अद्याप सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून तिघांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समितीमधील अफरोज अहमद आणि खर्डी येथील प्रभाकर भोईर यांचे अनाधिकृत वाढीव बांधकाम तोडण्यात आले. 
तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९७ (क) (१) ख, अन्वये अफरोज अहमद यांचे विरुद्ध डायघर  पोलीस स्टेशन तर साईनाथ टकले आणि अमर चिंचोळकर यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या