यामुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे

 

  ठाणे:  विनर बिंद्रा यांच्या वाढदिवसाचे निमित्तसाधून राज्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली जाण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याबरोबरच तृतीय पंथीयांना देखील रेशन किट देण्यात आले. तर अपंग व्यक्तींना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकार आपल्याला लस देत नाही. आपण मात्र या ठिकाणी लस खरेदी करून लोकांना मोफत देत आहोत. अनेक श्रीमंत लोकांना आपण वाढदिवस साजरा करताना आपण पाहत असतो. मोठ्या हॉटेलमध्ये ते लोक वाढदिवस साजरा करतात. पण काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या वाढदिवसाच्यानिमित्ताने लोकांना मदत करतात ही खरेच अभिमानाची गोष्ट आहे, असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते ठाणे काँग्रेसचे उपाध्यक्ष विनर बिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

  यापूर्वी काॅग्रेसच्या कार्यकाळात भविष्याची तरतूद म्हणून जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत असे परतु आज बँकेच्या प्रत्येक देवाणघेवाण करण्यासाठी चार्जेस आकारण्यात येत आहेत सरकारकडे विविध मार्गाने कररूपाने आलेला पैसा हा सर्वासाठी विविध सुविधा,मदत कार्य,देश उभारण्याकरिता वापरला जात होता पण आता केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे मूठभर धनिकाकडे हा पैसा जात असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.ठाण्यातील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काही महत्वाचे विषय सातत्याने जनतेसमोर आणले जात असून त्याला ठाणेकर नागरीक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत,ठाणे काँग्रेसमधील काही संघटनात्मक बदल आपल्याला येत्या काही दिवसांतच दिसतील असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. 

केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळेच आज सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असून देशातील काळे धन येणार म्हणून केलेली नोटबंदी,प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार म्हणुन निवडकीत दिलेले आश्वासन,2 कोटी बेरोजगार युवकांना नोकरी या सर्वच विषयावर केंद्रातील भा.ज.पा.सरकार फोल ठरली असून भारतीय जनता पार्टीचे पापाचा घडा भरत चालला लवकरच हे चित्र स्पष्ट होईल, जनताच त्यांना आता चोख उत्तर देईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी ठाण्यात व्यक्त केला.

ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, असे थेट आव्हानच यावेळी पटोले यांनी भाजपला दिले आहे. या कार्यक्रमात त्यांनी मोदी सरकारवरही तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. या नोटबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मोदींनी काळा पैसा देशात आणणार होते, याबरोबरच ते १५ लाख रुपये देखील तुमच्या खात्यात टाकणार होते. मात्र, यांपैकी त्यांनी काहीही केलेले नाही. नोटाबंदीनंतर तर लोक रांगेतच मरण पावले. अजूनही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये आले नाहीत, असे सांगतानाच भाजप सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे. जीएसटी आल्यानंतर हे सगळे पैसे कुणाच्या घरी गेले हे सर्वांना माहीत आहे, असे सांगत पटोले यांनी मोदींवर उद्योजक आणि व्यावसायिकांचे खिसे भरल्याचा थेट आरोप केला. सामान्य माणसाला मात्र जीएसटीचा काहीच फायदा झाला नसल्याचे ते म्हणाले. देशात लशीचा तुटवडा आहे. शिवाय पूर्वी मोफत मिळत असलेले ऑक्सिजन आता केंद्र सरकारमुळे विकत घेण्याची वेळ आली आहे आणि ही वेळ आणण्याचे पाप मोदी सरकारने केले, असेही पटोले पुढे म्हणाले. केंद्रातील सरकारच्या निर्देशानुसारच अनेक चुकीच्या प्रकारच्या चौकश्या केला जात असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण  यांच्यासह हिरालाल भोईर, किशोर खत्री, प्रमोद इंगळे, चंद्रभान आझाद, भास्कर वाघमारे आदी मान्यवरांनी ठाण्यामध्ये त्यांचे स्वागत केले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA