ज्युपिटर हॉस्पिटलमधील वॅलेट पार्कींगचा गोरखधंदा

  ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल हे मोठं नावाजलेलं हॉस्पिटल असून या रूग्णालयात दूरदूरच्या भागातून रूग्ण येत असतात. या रूग्णांसाठी सातत्याने नातेवाईकांनाही ये-जा करावी लागते. आपल्या वैयक्तिक वाहनांतून हे नातेवाईक येथे येत असतात. त्यांना पार्कींगसाठी जागा नसल्याचं रूग्णालयातर्फे सांगितलं जातं. मात्र रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच वॅलेट पार्कींगच्या नावाखाली रूग्णालयात येणा-यांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी वाहनं उभी करण्यासाठी १०० रूपयांपासून पुढे पैसे आकारले जातात. मात्र त्यासाठी दिलेली पावतीही थातुरमातुर असते. अनेकदा त्यावर सही-शिक्काही नसल्याच्या तक्रारी नातेवाईकांकडून केल्या जातात. ज्युपिटर हॉस्पिटल म्हणजे मॉल अथवा मोठं हॉटेल नसून तिथे गरजू रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात. मात्र त्यांच्याकडून अशी वसुली केली जाते आणि त्याकडे कोणाचंच लक्ष नसतं अथवा दुर्लक्ष केलं जात असल्याचं म्हटलं जातं. खरंतर पार्कींगसाठी पैसे जमा करण्यास परवानगी आहे का, या पार्कींगसाठी परवानगी कुणी दिली. यातून काही कर शासन अथवा महापालिकेला मिळतो का असे अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. पण याकडे  लक्ष द्यायला महापालिकासह कोणालाच वेळ नसल्यामुळं सध्या रुग्णांच्या नातेवाईकांची ही लूट सुरूच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या