ठाणे पालिकेचा कारवाईचा बडगा सुरूच

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.       या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील एनआरनगर तळ अधिक ३ मजली इमारतीतील ४ थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली. 

 मोठ्या इमारतींवर केलेली ही कारवाई तकलादू प्रकार होत असून केवळ मधल्या भिंती आणि वरवर हातोडा मारून पालिका कारवाई करते. संपूर्ण बांधकाम जमिनदोस्त करत नाही. मात्र छोट्या बांधकामांना संपूर्ण जमिनदोस्त केले जात आहे. फेरीवाले अथवा छोट्या व्यापाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना संपूर्ण उध्वस्त करण्याचे काम गेले दोन दिवस होत असताना आज करण्यात आलेली ही कारवाई पाहता नाममात्र कारवाई असल्याची चर्चा ठाणेकरांमध्ये रंगली आहे. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA