महाड-पोलादपूरसाठी ठाणे महापालिकेचा ''एक हात मदतीचा'' उपक्रम

  ठाणे -अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली असून तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने ''एक हात मदतीचा'' हा उपक्रम हाती घेण्यात आला  आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील महाड-पोलादपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये स्थानिक नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून त्यांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहेत, त्या अनुषंगाने तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्यावतीने 'एक हात मदतीचा'' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

        या उपक्रमात मिनरल वॉटर, कपडे, टॉवेल, खाण्याचे पदार्थ, अन्नधान्य( तांदूळ, खाद्यतेल, मीठ, मिरची इद्यादी), चादर, सतरंजी, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, मेणबत्ती, टॉर्च तसेच लहान मुलांसाठी खाऊ आदीची मदत स्विकारण्यात येत आहे. एक '' हात मदतीचा'' या उपक्रमात मदत देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी ठामपा  शाळा क्र.४४, दत्तमंदिर समोर शास्त्री नगर बस स्टॉप, वर्तकनगर येथे सकाळी ९. 00 ते सायं. ६. 00 या वेळेत दिपाली पवार (+ ९१ ९१५६८६४०२७), विनोद तमखाने (+९१ ८८८८८७६१९४) यांच्याशी संपर्क साधावा 

तसेच महिला आधार केंद्र जहांगीर हाईट्स तत्वज्ञान विद्यापीठाच्या बाजूला घोडबंदर रोड येथे विजय टेकवाड (+ ९१ ८६६८२८ ९५१०) विठ्ठल मोरे (+९१ ९७६३३००६०२) आणि शाळा क्र.६९ कळवा प्रभाग समिती कळवा येथे ठाणे लखन जाधव (+९१ ८८५०७१९३६१) राजेंद्र मोटे (+९१ ८४२२९३६१८६) व रावसाहेब त्रिभुवन (+९१ ७७३८०३५३६०) यांच्याशी संपर्क साधावा. यासोबतच या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी उप आयुक्त मनीष जोशी (+९१ ९१६७०४३६०६), उप आयुक्त श्रीमती वर्षा दिक्षित (+९१७३०४६५३२४९) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर (+ ९१ ९७६९००७८७८) यांच्याशी संपर्क साधावा. ठाणेकरांनी या सामाजिक उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी होवून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे 

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी महानगरपालिकेची ३ वैद्यकीय पथके आज २५ जुलै रोजी चिपळूणला रवाना करण्यात आली. ही पथके महापालिका महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी व अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्या समन्वयाने मदत कार्य करणार आहेत. यामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. या पथकांसोबत रॅपीड अँटीजेन टेस्टींग कीटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॅाक्टर्स, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात आला आहे.

आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाच्या या पथकांचे पोहोचताच क्षणी प्रत्यक्ष कार्य सुरु झाले असून आज पहिल्याच दिवशी साफसफाई, आरोग्य तपासण्यांच्या कामाने वेग घेतला आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी २५० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.  या ठिकाणी कुठलाही साथरोग उद्भवू नये तसेच कोविडच्या संसर्गाचा वेळीच प्रतिबंध करता यावा यासाठी वैद्यकीय पथकामार्फत तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास २५० व्यक्तींची रॅपिड ॲटीजन टेस्ट, लेप्टोस्पायरोसीस तसेच मलेरिया तपासणी करण्यात आली असून चिखल्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत.  या रुग्णांवर वैद्यकीय पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत.  तसेच घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व परिसराची साफसफाई करण्यात येत असून फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून सोडियम हायपोक्लाराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी १० हजार लिटर्स पाण्याचा एक टॅंकर आणि पाण्याच्या बाटल्याच्या दोन ट्रकच्या माध्यमातून तेथील नागरिकांना पाणी वाटण्यात येत आहे. तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या माध्यमातून परिसराच्या साफसफाई करण्यात येत आहे. यासोबतच महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीमच्यावतीने मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांची तातडीने विल्हेवाट लावण्यात येत आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA