वीज पुरवठा नियमित न केल्यास महावितरण कार्यालयास घेराव घालू - आमदार केळकर

  गेले काही दिवस ठाण्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने उद्योग-व्यवसाय, ऑनलाईन अभ्यास तसेच वर्क फ्रॉम होम करणा-या नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. एकीकडे ग्राहकांना अवाच्या सवा बिले दिली जात असताना पुरेसा वीज पुरवठा केला जात नाही. याबाबत ठाणेकरांमध्ये संतापाचे वातावरण असून पुरवठा नियमित न केल्यास महावितरण कार्यालयास घेराव घालू असा इशारा केळकर यांनी दिला आहे.

 एकीकडे हायटेक प्रणालीद्वारे महावितरण कात टाकीत असल्याचा दावा उर्जामंत्री करीत असले तरी नियंत्रणात कक्षात कर्मचारी फोन उचलत नाहीत, हा कक्षच वा-यावर आहे. त्यामुळे नागरिकांनी वीजेसंबधित तक्रारी करायच्या कुठे?, असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला असून वीज पुरवठा नियमित न झाल्यास महावितरण कार्यालयास घेराव घालु असे केळकर यांनी स्पष्ट केले आहे.. 

पावसाने उसंत घेतली असतानाही तांत्रिक बिघाडामुळे ठाण्यात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. विजेच्या अनियमित पुरवठ्याचा परिणाम उद्योग- व्यवसायावर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून गृहिणींनाही घरगुती कामात व्यत्यय येत आहे. सध्या जे उद्योग-व्यवसाय नियमानुसार ठराविक मर्यादित कालावधीत सुरू आहेत त्यांनाही वीज खंडीत झाल्याने नुकसान सोसावे लागत आहे. अनेक तक्रारी आल्याने ठाणे संजय केळकर यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता अरविंद बुलबुले यांना जाब विचारला. त्यावर त्यांनी तातडीने यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, तत्काळ वीजपुरवठा नियमीत सुरु न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा संजय केळकर यांनी दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या