
वर्तकनगर प्रभाग समितीमधील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करून बांधकाम तोडण्यात आले. आज वर्तकनगर प्रभाग समितीमधील उपवन येथील शुभम लॉज व येऊरमधील बॉम्बे डक हॉटेलचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.
तसेच कळवा प्रभाग समितीमधील दत्तवाडी येथील शासकीय भूखंडावरील तळ अधिक ७ मजल्याच्या अनधिकृत इमारतीमधील आणि पारसिक नगर येथील तळ अधिक ८ मजल्याच्या अनधिकृत इमारतीतील अनधिकृत खोल्यांचे बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने तोडण्यात आले. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निष्कासनचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे आणि प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.
0 टिप्पण्या