विपश्यना साधना केंद्र कासणे, येथे उद्या जीवनसंध्या गौरवधाम भूमिपूजन कार्यक्रम


विपश्यना नीम-स्वास्थ्य विहार भव्य वृक्षारोपण आणि मातोश्री दमयंती जीवनसंध्या गौरवधामचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.   दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्ट (रजि.)च्या   धम्मराजिक महाविहार  विपश्यना साधना केंद्र  कासणे, पो.वासिंद, अंबाडी रोड, मुंबई-नाशिक हायवे रोड,  जि.ठाणे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक आणि दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष भदन्त विनयबोधि यांनी केले आहे. 

दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्ट च्या माध्यमातून कासने गाव येथील 4.5 एकर जागेमध्ये भदंत विनयबोधी महाथेरो यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविले जात आहेत, मागील 18 वर्षात येथील विहाराच्या प्रांगणात,Art गॅलरी,ध्यान सभागृह,सुसज्ज ग्रंथालय,भोजनालय, गरजुंसाठी आपत्कालीन दवाखाना,औषधी वनस्पती व नीम नर्सरी,असे प्रकल्प राबविले जात आहेत, मुंबई ठाणे,नवी मुंबई आणि परिसरातील हालाखीत जीवन जगणाऱ्या वृद्ध माता पित्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आनंदी व चिंतामुक्त जीवन जगता यावे यासाठी भव्य वृद्धाश्रम उभारला जाणार आहे,

 मातोश्री दमयंती यांच्या नावाने उभा राहणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन  आणि 1.5 करोड नीम राजस्थान आणि देशभरात लावण्यासाठी  व पर्यावरण रक्षणासाठी सतत कार्यशील असलेले लोकमित्र महेश्री यांच्या सहयोगाने येथील वृद्धाश्रम Old Age Home,#जीवन संध्या गौरवधाम या सन्मानधारक नावाने उभा केला जात आहे,या कार्यक्रमात जवळपास 400 नीम वृक्ष लावले जावून ऑक्सिजन हब निर्मिती केली जाणार आहे  तसेच प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक यांच्या सहयोगाने उपस्थित नागरिकांना 100 बुद्ध मूर्ती चे वाटप केले जाणार आहे ,

दिल्ली प्रदेशचे समाजकल्याण मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या हस्ते सदर भूमिपूजन होणार असून यावेळी ज्येष्ठ विधितज्ञ तथा राजकीय विश्लेषक मा.डॉ.सुरेश माने, मारवाडी महासभेची सभापती लोकमित्र महेश्री, सिने अभिनेते गगन मालिक, तसेच समाजसेवक अशोक गर्ग,  उद्योगपती नानजीभाई खिमजीभाई ठक्कर,  राजकुमार सैनि, रामस्वरुप डांगरा,  महेंद्र जैन, किशोर खत्री, समाजसेवक हिरालाल भोईर, सुरेश खेडेपाटील, प्रमोद इंगळे, चंद्रभान आझाद आणि भास्कर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

दिपंकर विपश्यना मेमोरियल ट्रस्टविषयी....

20 जानेवारी 9९९८ रीजी विपश्यना आचार्य कल्याणमित्र सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी भिक्खू आचार्य संघाची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये भिक्खू संघाच्या मार्गदर्शनास्त्राली विपश्यना साधना केंद्र आणि भिक्खू प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात यावे, अशी गोयंका गुरुजी यांनी भिक्खूसंद्याला विनम्र सूचना केली. त्यांच्या सुचनेचा आदर करून भदन्त विनयबोधि महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली 9 मार्च 9९९८ रीजी दिपंकर विपश्यना मेमोरिअल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ट्रस्टच्या माध्यमातून बिपश्यना केंद्र आणि भिक्खू प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यासाठी सन् 2००० मध्ये ठाणे जिल्ह्यातील वासिंद रेल्वे स्टेशन जवळ मौजे कासने या ठिकाणी साडेचार एकर जमिन विकत घेण्यात आली. या धम्मभूमीवर भिक्खू निवास,  नागार्जुन प्राथमिक आरोग्य केंद्र (दवाखाना),  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि शांतिस्तुपाचे बांधकाम  सुरु करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य युतळा बसविण्यात आला. तसेच डॅलेक्‍ट्रीक ट्रान्सफार्मर देखील बसवण्यात आले. 

मुंबई शहर आंतरराष्ट्रीय शहर असून व्याचाराचे मोठे केंद्र आहे. मुंबई भारत देशाची आर्थिक राजधानी असून जगातील अनेक धम्म बांधब तथागत भगवान बुद्धांचा धम्म समजुन घेण्यासाठी उत्सूक आहेत. मुंबई शहराचासून ७० कि-मी-अंतरावर नाशिक (नॅशनल हायवे) रोडवर या भव्य वास्तूची निर्मिती होत आहे.   आपल्या समाजाचा सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक स्तर उंचावण्याकरिता, धम्म उद्देशाच्या पुर्ततेकरिता आपणा सर्वांची जबाबदारी असून तन-मन-धनाने सहकार्य करावे. आपल्याला विनंती करण्यात येत आहे की, आपण साधना केंद्र आणि धम्मराजिक महाविहाराला स्वतः भेट देऊन प्रत्यक्ष सत्याची पडताळणी करावी. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA