"त्या" कायद्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्राला नाही- शरद पवार

  केंद्राने जरी सहकार खाते निर्माण केलेले असले तरी राज्यातील कारखानदारींवर गडांतर येणार असल्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही. तसेच राज्यघटनेनुसार सहकार हा ठिषय राज्यांच्या सूचित येतो. त्यामुळे त्याठिषयीचे कायदे यापूर्वी राज्य सरकारने केलेले आहेत. त्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्राला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  स्पष्ट केले. तसेच मल्टीस्टेट बँकांचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असून यापूर्वी होता आणि आताही असल्याचे सांगत सहकार विषय नवा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या सहकार खात्यावरून राज्यातील साखर कारखानदारीबद्दल  अनेक तर्क वितर्क लढठिण्यात येत होते. तालिका अध्यक्ष तथा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष पदावरून केलेली विधाने यासह काँग्रेस पाठोपाठ आता शिवेसेनेनेही दिलेला स्वबळाचा नारा यावरून शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून असलेली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान समान नागरी कायद्यासंदर्भात बोलताना त्यांनी केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असल्याचे त्यांनी सांगत याप्रश्नी अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले .  

काँग्रेसेच्या हिश्शाचे विधानसभा अध्यक्ष पद सध्या रिक्‍त असतानाच नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ज्या पध्दतीने अध्यक्ष पद सांभाळून दाखविले. तसेच तिन्ही पक्षांनी मला आपल्याला अध्यक्षपदी बसविले तर स्किकारण्याची तयारी दर्शवित वन मंत्री पदही शिवसेनेकडे रहावे असे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना विधानसभा अध्यक्ष पद हिसकावून घेणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली. या चर्चेचा अनुषंगाने ते म्हणाले की, आमच्या तीन पक्षांचा निर्णय झाला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळें  कोणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहें. त्या निर्णयावर आम्ही कायम असल्याचे सांगत शिवसेनेला हे पद जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेनेनेही स्वबळाचा नारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता ते म्हणाले की, आम्ही आघाडीच्या  माध्यमातून एकत्रित सरकार चालवित असलो तरी आम्ही पक्ष एकत्रित चालवित नसल्याचे स्पष्ट करत प्रत्येकजण आपला राजकीय  पक्ष मोठा करण्याच्या प्रयत्नात असणार. काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर त्यात काहीही चुकीचे नाही. आम्ही प्रत्येकजण पक्ष  वेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे यात  गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA