Top Post Ad

अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा आजही हातोडा

   मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे निष्कासित

ठाणे :  ठाणे महापालिकेच्यावतीने गेल्या ४ दिवसात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत असून आज दिवा प्रभाग समिती व कळवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली. 

     या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रा देवी रोड येथील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. तर कळवा प्रभाग समितीमधील पारसिक नगर, खारेगाव आणि विटावा येथील अनधिकृत बांधकामे निष्कासित जमीनदोस्त करण्यात आली.       सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com