Top Post Ad

मैत्री थाई प्रोजेक्ट च्या माध्यमातून थाईलैंडच्या उपासंकाद्वारे 31 रुग्णवाहिकाचे दान

    कोरोनाच्या संकटामधे थाईलैंडचे पूजनीय भंते अजाहन जयासारो आणि त्यांच्या थाई बौद्ध धम्म उपासकांनी,आय ए एस डॉ.हर्षदीप कांबळे आणि रोजाना कांबळे यांच्या सहकार्याने भारतामध्ये 31 रुग्णवाहिकाचे दान दिले आहे. आज पुण्यामधे टाटा मोटर्स या ठिकाणी रुग्णवाहिकांचे भिक्षु संघाच्या उपस्थिती मध्ये लोकार्पण करण्यात आले. या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमाला थाईलैंड चे कॉन्स्युलेट जनरल श्री सिरिकुलहे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते | 

  

भारतामध्ये जेव्हा कोरोनाची दूसरी लाट उंचीवर होती तेव्हा दुःख,वेदना आणि चिंतेने ग्रस्त भारतीयांसाठी थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी मदतीचा हाथ दिला. संवेदनशीलता, दानपारमिता,मैत्रीभावना,समर्पण आणि महाकरुणा या बुद्ध वचनांचा अनोखा मिलाप दोन्ही देशांचा दुवा ठरला.मैत्री थाई प्रोजेक्टच्या माध्यमातून थाईलैंड मधील थेरवादा फ़ॉरेस्ट ट्रेडिशनचे परमपूजनीय भंते अजान जयासारो यांच्या आव्हाना नुसार थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी भारतीय जनतेसाठी बुद्धांनी संगितलेल्या दानभावने नुसार  31 रुग्णवाहिका (Ambulance) ची बहुमोल अशी मदत केली आहे.

महाराष्ट्राचे इंडस्ट्री कमिशनर (Industry Commissioner) हर्षदीप कांबळे यांच्या माध्यमातून ही सर्व मेडिकल सहायता भारताला प्राप्त झाली. त्यापैकी ऑक्सयजेन कॉन्व्हेंटर (Oxygen Concentrator) आणि व्हेंटिलेटरवर (Ventilator) चे यापूर्वी वितरण झालेले आहे. तर 31 रुग्णवाहिका (Ambulance) चा लोकार्पण समारोह आज पुण्या मध्ये पार पडला.

भगवान बुद्ध उपदेश देतांना सांगतात जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो अर्थात हे जग एकमेकांवर निर्भर आहे. भगवान बुद्ध दानपारमितेला अत्यधिक महत्व देतात,ही शिकवण अखिल मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे. बोधगया,सारनाथ,राजगीर,कुशीनगर,लेह-लद्दाख़ या बौद्ध स्थला सह नागपुर,औरंगाबाद, बंगलोर, दिल्ली सह भारता मधील 31 ज़िल्हया मध्ये या रुग्णवाहिका (Ambulance) चे दान दिले जाईल.या दाम्पत्याचे मनापासून स्वागत आणि मंगलकामना आणि पूजनीय भंते अजान जयासारो ज्यांच्या निर्देशाने हे सर्व शक्य झाले त्यांचे आणि थायलंड (Thailand) च्या बौद्ध उपासकांचे समस्त भारतीय जनते च्या वतीने आभार आणि साधुवाद.भवतु सब्ब मंगलम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com