
बोगस वेबसाईटच्या माध्यमातून आणि राम मंदिराच्या नावाखाली आरोपींनी देणगीदारांकडून किती रुपये उकळले याचा तपास सुरु असून बनावट वेबसाईट बनवण्याचे बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामागे आणखी कुणाचा हात आहे. किती मोठे रॅकेट आहे, कोणत्या संस्थेशी यांचा संबंध आहे याचा तपास पोलिस करत असून अटक करण्यात आलेल्यांची ओळख पटवण्यात आली आहे. आशिष गुप्ता (वय २१), नवीन कुमार सिंग (वय २६), सुमित कुमार (वय २२), अमित झा (वय २४) आणि सुरज गुप्ता (वय २२) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाच जणांपैकी तीन जण अमेठी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, तर दोघे बिहारमधील सीतामढी येथील आहेत. पाचही जण सध्या नोएडाला लागून असलेल्या पूर्व दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरात राहत होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून पाच मोबाईल जप्त केले. त्याचबरोबर एक लॅपटॉप आणि आधार कार्डच्या ५० प्रतीसह अन्य साहित्य ताब्यात घेतले असल्याचे वृत्त एका हिन्दी वेबसाईटने दिले आहे.
0 टिप्पण्या