Top Post Ad

... तेरे राज मे , कटोरा आया हाथ मे, समाजवादी पार्टीचे महागाईविरोधात आंदोलन


भिवंडी-  सध्या देशभर कोरोना संकट असतांनाही केंद्र शासनाने घरगुती गॅससह पेट्रोल , डिझेलच्या इंधन दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आल्याने देशभर प्रचंड महागाई वाढली आहे.या घटनांना केंद्र शासन जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.समाजवादी पक्षाचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांच्या सुचनेनूसार भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्राचे समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हे आंदोलन पार पडले.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. " मोदी तेरे राज मे , कटोरा आया हाथ मे"अशा घोषणा देत केंद्रातील भाजप सरकारच्या ' सबका साथ सबका विकास ' या घोष वाक्याचा खरपूस समाचार घेत केंद्र सरकार विरोधात घोषणा करत केंद्र शासनाच्या इंधन दर वाढीचा व महागाई वाढीचा देखील जाहीर निषेध केला.

         भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या समाजवादी पक्ष कार्यालयापासून दुपारी ३ वाजता हे आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र शासनाचा निषेध नोंदवत आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार रईस शेख यांनी भिवंडी प्रांत अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांच्याकडे सुपूर्द केले.दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली असतांना देखील समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात समाजवादी कार्यालय ते प्रांत कार्यालय असे  पायी आंदोलन केले.मोदी सरकारने देशातील जनतेच्या माथी मारलेली इंधन दरवाढ व महागाई कमी केली नाही तर याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com