दहा प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत अपेक्षित

 

 मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने मागील वर्षापासूनच सुरुवात केली आहे. प्रचाराची यंत्रणा आयटी सेलमार्फत कामालाही लागली आहे. निरनिराळ्या  पोस्टद्वारे मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्याची तयारी जोरदार सुरु असतानाच  काँग्रेसनेही स्वबळावर निवडणुक लढवण्याची तयारी केली असल्याचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी संकेत दिले आहेत. मात्र या निवडणुका केव्हा होणार हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड यासह राज्यातील सुमारे १० महानगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारीत अपेक्षित आहेत. मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे अद्यापही याबाबत निर्णय होत नाही आहे. त्यातच महामारीची दुसरी लाट येणार असल्याचा सुतोवा प्रशासन, शासन करीत आहेत. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी लसीकरणाचा वेग वाढला आणि कोरोनाची लाट नियंत्रणात राहिली तर या सर्व निवडणुका वेळेवर होऊ शकतात. यासाठीच सर्व पक्ष लसीकरण मोहीम राबवत असल्याची चर्चा होत आहे. 

प्रमुख शहरातील महानगर पालिकांची अंतिम मुदत : मुंबई -७ मार्च २०२२, अमरावती -६ मार्च २०२२, सोलापूर -७ मार्च २०२२. नाशिक -१४ मार्च २०२२. पिंपरी-चिंचवड - १३ मार्च २०२२, ठाणे - ५ मार्च २०२२. पुणे - १४ मार्च २०२२. अकोला - ८ मार्च २०२२. नागपूर - ४ मार्च २०२२. उल्हासनगर - ४ मार्च २०२२. :औरंगाबाद -१८ एप्रिल २०२०, नवी मुंबई - ८ मे २०२०, वसई -विरार - २७ जून २०२०. कोल्हापूर - १५ नोव्हेंबर २०२०. 

दरम्यान औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांसह ६५ नगरपालिका आणि नगर परिषदांच्या कोरोना साथीमुळे प्रलंबित निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केल्याची माहीती सुत्रांकडून मिळत आहे. औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार आणि कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणुका वर्षभरापासून प्रलंबित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभांच्या निवडणुका होऊ शकतात तर महापालिकांच्या निवडणुका का घेण्यात येत नाहीत, असा सवाल या याचिकांद्वारे करण्यात आला आहे.  मात्र महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती बघून ऑक्टोबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचे समजते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA