
शहापूर : "मानवी जीवनात वृक्षाला अन्यन साधारण महत्व असून फळझाडाचे जतन करुन प्रत्येकाने जंगलांचे संरक्षणं संवर्धन करणे गरजेचे आहे. असे स्पष्ट मत वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यानी व्यक्त केले. वन्यजीव विभाग ठाणे व सानवी सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तानसा अभयारण्यातील खर्डी वनपरिक्षेत्रातील वराते पाडा, पळशीन येथे कोरोना नियमांचे पालन करत मौल्यवान फळझाडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

फळझाडे आणि जीवनावश्यक वस्तूचा लाभ खर्डी परिसरातील मनाचा आंबा, तळवडे, शिसवली, तुंबडे पाडा, कंढर पोई, वारेपाडा, भेकर माळ, बोराळा, राजपुरी येथील ग्रामस्थांनी घेतला. या प्रसंगी खर्डी वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर, सानवी सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन मुंबई, संचालिका इशा नायक, प्रोजेक्ट मॅनेजर सत्या काटे, समाजसेवक चंद्रकांत पष्टे, ओसवाल ग्रुपच्या समीक्षा सिंग, ग्रुप ग्रामपंचायत दहिगाव सरपंच दीपक सापळे , कृष्णा भवर, सुनील करपट, भास्कर मसे, देवजी पांनगा श्रीमती सावित्रीबाई व ग्रामस्थ आणि वन्यजीव खर्डी विभागाचे वन कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात चंद्रकांत पष्टे यांनी त्यांची तीन वर्षाची मुलगी सिया हिच्या वाढ वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच ओसवाल ग्रुपच्या समीक्षा सिंग यांनी मिळून आठशे फळ झाडे उपलब्ध करून दिली तर रोटरी क्लब ऑफ क्वीन नेकलेस मुंबई आणि जीओ रोटी घर , सायन तसेच सानवी सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन मुंबई यांच्या सहकार्याने २५० नग जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, तूरडाळ, साखर, चहा पावडर, पोहे, रवा, मीठ, तेल, बिस्कीट, नूडल्स व साबण या वस्तूंचा समावेश असलेल्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आला.
0 टिप्पण्या