Top Post Ad

ठाणे महापालिकेत प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

ठाणे - मान्सून कालावधीत प्रत्येक प्रभाग समितीनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर आता प्रभाग समिती स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापन करण्यात आली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.      मान्सून कालावधीत झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे, सखल भागात पाणी साचणे, भुस्खलन होणे आदी घटना घडू शकतात अशावेळी नागरिकांना तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रभाग समिती स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्षात तीन सत्रामध्ये मनुष्यबळ व मशीनरी तैनात करण्यात आली आहेत. या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक देण्यात आले असून नागरिकांनी त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

      नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत टोल फ्री - १८०० २२२ १०८ व हेल्पलाईन - ०२२ २५३७१०१० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नौपाडा - कोपरी प्रभाग समिती- २५३२५१६६/२५३३४४७१, उथळसर प्रभाग समिती- २५४७३५६८/२५४७३५४१, वागळे इस्टेट प्रभाग समिती- २५८२६८ ९ १ / २५८२६८ ९ ०, लोकमान्य - सावरकरनगर प्रभाग समिती- २५८८५०४३/२५८८५८०१, वर्तकनगर प्रभाग समिती- २५८८५८०१/२५८८५०४३, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती- २५४४७२२०/२५४०२३७५, आणि  कळवा प्रभाग समिती- २५४१०४७० या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

   तसेच जवाहर बाग अग्निशमन १०१/२५३३१६००/२५३६५२०२/ २५३३४२१६, कोपरी अग्निशमन केंद्र २५३२५३१३, वागळे इस्टेट अग्निशमन केंद्र २५८२३४७७/ २५८२३५४७/२५८२०६६०,  बाळकूम अग्निशमनकेंद्र २५३६६७०२/ २५३६३१०१/ २५३६६४०१, मुंब्रा अग्निशमन केंद्र २५४६२४२४/ २५४६२४४४,  पांचपाखाडी अग्निशमन केंद्र २५३३१३ ९९ / २५४४०७ ९९ / २५४४०७ ९८, रुस्तमजी अग्निशमन केंद्र २५४४००२० शिळ अग्निशमन केंद्र ७३०५ ९ ३ ९ १०१ / ७३०४४ ९ ३१०१, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन १०७७ / २५३८१८८६ / प्राधिकरण , ठाणे २५३०१७४० / फॅक्स -२५३४ ९ २००, ठाणे पोलिस नियंत्रण कक्ष २५४४२१२१/२८२८/३५३५/३६३६ आणि शहर वाहतुक नियंत्रण कक्ष ८२८६३००३००/४०० ४०० २५४०१०५६ या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com