सत्ताधारी शिवसेनेनं २०१७ च्या निवडणुकीत ५०० चौरस फुटाच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र नंतर या आश्वासनाचा शिवसेनेला विसर पडला. निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे ही करमाफी मिळावी या मागणीसाठी ठाणे वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेच्या वतीने महापालीकेसमोर करमाफी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. अल्पेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हातात बॅनर घेऊन 20 ते 25 ठाणेकरांनी हे आंदोलन केले. लवकरात लवकर ठाणेकरांना ही करमाफी लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
काही महिन्यापूर्वी भाजपने देखील ५०० चौ. फुटांच्या घरांना अद्यापही करमाफी न दिल्याचा निषेध करीत ‘क्या हुवा तेरा वादा’ म्हणत बॅनरबाजी केली होती. बॅनरवर ‘झुठा है तेरा वादा’… म्हणत सत्ताधारी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. तसेच मनसेने देखील ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा यासाठी महापालिकेसमोर आंदोलन केले होते. परंतु सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने तुर्तास करमाफी शक्य नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले होते.
0 टिप्पण्या