नवी मुंबई विमानतळाला राजर्षि शाहू महाराजांचे नाव द्या - ओबीसी नेते सुरेशदादा पाटीलखेडे

   या महाराष्ट्रात शिवरायांनंतर तमाम बहुजन समाजाला  न्याय देण्याचे कार्य कुणी केले असेल तर ते केवळ राजर्षि शाहू महाराज यांनी. आपले राजेपण हे मिरविण्यासाठी नसून लोकांच्या सेवेसाठी आहे. राजेपद हे शाहू महाराजांच्या दृष्टीने नगण्य होते. मात्र लोकसेवेसाठी ते टिकविणे जरूरी होते. त्यातूनच राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. म्हणूनच ते लोकनेता होते. यासाठी पनवेल येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव केंद्रातील सरकार आणि विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार देऊ शकत नसेल तर या विमानतळाला राजर्षि शाहू महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी ओबीसी नेते सुरेशदादा पाटीलखेडे यांनी केली. 

 राज्यव्यापी वृत्तपत्र व वृत्तवाहीनी पत्रकार महासंघाच्या विद्यमाने ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम परिसरात आज राजर्षि शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये पाटीलखेडे बोलत होते. त्यांच्या या मागणीला सर्व उपस्थितांनी पांठिबा दर्शविला. यावेळी रिपाई नेते सुखदेव उबाळे, बहुजन समाज प्रबोधिनीचे प्रमोद इंगळे, संपादक अशोक झा यांच्यासह संस्थेचे विलास शंभरकर, सुबोध शाक्यरत्न, रमेश तायडे, किशोर बनकर, देवेंद्र वाईरकर, तसेच अश्विन कांबळी,  प्रकाश दळवी, बाळू उघडे यांच्यासह अनेक पत्रकार मंडळी उपस्थित होती. 

आपल्या भाषणात पाटीलखेडे पुढे म्हणाले, दि.बा.पाटील यांच्या नावाबाबत आम्हाला वाद नाही. मात्र काही लोकांच्या दृष्टीने एवढ्या मोठ्या अंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक नेत्यांचे नाव कशाला अशा कुत्सित मानसिकतेने ते ग्रासले आहे. दि.बा पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळालेच पाहिजे. मात्र इथल्या व्यवस्थेने या मागणीला कलाटणी देण्यासाठी आता विविध मागण्यांचा रेटा पुढे लावला आहे. त्यातून छत्रपती शिवरायांचे नाव देखील देण्यात यावे अशी मागणी होत आहे. मात्र मुंबईसारख्या प्रमुख विमानतळाला शिवरायांचे नाव असताना त्याच नावाचा पुन्हा आग्रह कशाला तर यामागे केवळ राजकारण आणि लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा डाव आहे. तेव्हा आम्ही देखील  या द्वारे आता मागणी करीत आहोत की, राजर्षि शाहू महाराजांचे नाव या विमानतळाला देऊन राजर्षिचा गौरव व्हावा. अशी मागणी पाटीलखेडे यांनी केली.

राजर्षि शाहू महाराजांचा गौरवाची महती सांगणारी कविता वाचून प्रमोद इंगळे यांनी राजर्षिंना अभिवादन केले, तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाकरिता विलास शंभरकर आणि रमेश तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA