Trending

6/recent/ticker-posts

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय विकसित होणार

 सविस्तर अहवाल सादर करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश 

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय विकसित करण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जागा मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीने सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय विकसित करण्यासंदर्भात मंगळवारी मंंत्रालयात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमान, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते.

 मुख्यालयासाठी चाळीस एकर जागेची मागणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.  ठाणे ग्रामीणचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात असताना त्यांचे मुख्यालय मात्र ग्रामीण भागात नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी याप्रकरणी मुख्यालयासाठी  किती जागा लागेल याचा सविस्तर अहवाल देण्याची विनंती केली आहे. त्याप्रमाणे मुख्यालय विकसित करण्यासाठी पोलीसांना जागेचा ताबा आगावू मिळावा, यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीने सविस्तर अहवाल सादर करावा असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. जिल्हा पोलीस मुख्यालयासाठी चाळीस एकर जागेची गरज लागेल, याकडे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी लक्ष वेधले.


Post a Comment

0 Comments