नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी आता अदानी समुहाकडे

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वाद सुरु आहे. तसेच ज्यांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या आहेत त्या भूमिपूत्रांच्या अनेक मागण्यां प्रलंबित आहेत. यावर अद्यापही कोणती चर्चा होत नाही. याबाबत स्थानिक भूमिपूत्रांमध्ये रोष व्यक्त होत आहे. याबाबत नियमित आंदोलने होत आहेत. असे असताना या विमानतळाची उर्वरीत ५० टक्के मालकीही आता अदानी समुहाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून मालकी हक्क बदलास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सदरच्या मालकी बदलास केंद्रातील मोदी सरकारने यापूर्वीच मंजूरी दिल्याने राज्य सरकारने त्यास फक्त मान्यता देण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता मुंबईतील सहार आणि छ.शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा जीव्हीके कंपनीने अदानी एअरपोर्टला हस्तांतरीत केल्यानंतर नवी मुंबई विमानतळाचा ताबा देखील अदानी समुहाकडे गेला आहे.

 नवी मुंबई विमानतळ उभारणीचे कामात जीव्हीके कंपनीचे ५०.५ टक्के सहभाग होता. हे सर्व सहभाग अदानी समुहाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचे काम आणि भागीदारी अदानी समुहाकडे राहणार आहे.   या बदलास केंद्र शासनाच्या नागरी विमान संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. तसेच सिडको संचालक मंडळाने देखील मालकी हक्काच्या बदलास मान्यता देण्याचा ठराव केलेला आहे. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प नियंत्रण व अमलबजावणी समितीने निर्देशित केल्याप्रमाणे या मालकी हक्कातबदल करण्यास आज बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 

नवी मुंबई येथे ११६० हेक्‍टर क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येत आहे. यातील ११६० हेक्‍टर जमीनीचे भुसंपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कांमे पूर्ण झाली आहेत. या विमानतळाचा पहिला टप्पा २०२३-२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सिडको नोडल एजन्सी म्हणून काम करत आहेत. या विमानतळाच्या बांधकामासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची सवलतधारक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA