पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद

    आज सकाळी घनकचऱ्याचा डंपर कोर्टनाका परिसरातील रेस्ट हाऊस जवळील रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याच वेळेस बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी इथे डंपर लावू नको, दुसरीकडे डंपर लाव असे त्या डंपर चालकाला सांगितले. हा डंपर चालक पालिकेचा कर्मचारी होता.  मी फोन करुन संबधीत अधिका:यांना विचारतो, असे त्याने सांगितले, तसेच डंपर पुढे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी  शिवीगाळ करीत त्याला खाली उतरुन मारहाण केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तेथे असलेल्या पालिका अधिका-याने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. पंरतु पोलिसांनी त्याला देखील शाब्दीक खडे बोल सुनावले. 

त्याच वेळेस या भागातून पालिका आयुक्तांचा पाहणी दौरा सुरु होणार होता. त्यामुळे दोन उपायुक्त तिथे उपस्थित होते. त्यांनी हा प्रकार पाहून मध्यस्ती करुन हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या पोलिसांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. परंतु तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका असे त्यांनीच त्यांना सुनावले. त्यावरुन हा वाद आणखीनच चिघळला. त्यावेळी तिथे बघ्यांची गर्दी झाली होती. ते दोन पोलीस निरिक्षिक ऐकण्यास तयार नसल्याने आम्ही संबधीत चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करु असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार हे प्रकरण ठाणे नगर पोलीस स्टेशन पर्यंत गेले. परंतु त्याठिकाणी गेल्यानंतर पोलीस आयुक्तांनी थेट या प्रकरणात मध्यस्ती केल्याने अखेर त्या पोलिसांना पालिका अधिकाऱ्यांची माफी मागावी लागली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA