दिव्यांग व्यक्तिंना प्राधान्याने लसीकरण मोहिमेत सहभागी करून घ्यावे- ठाणे राष्ट्रवादी युवती काँग्रेस

  ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिंना प्राधान्याने लसीकरण मोहिमेत सहभागी करून घ्यावे या मागणीसाठी ठाणे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .ठाणे  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिंना प्राधान्याने लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याबाबत निवेदन ठाणे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा पल्लवी शिवा जगताप यांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना देण्यात आले. कोरोना विषाणुला हरविण्यासाठी राज्यशासन व प्रशासन यांनी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचा लाभ दिव्यांग व्यक्तिंनाही मिळाला पाहिजे. ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तिंची लसीकरणासाठी गैरसोय होऊ नये, त्यांना रांगेत उभे राहावे लागू नये, किंवा त्यांच्यासाठी आठवड्यातील एखादा दिवस राखीव असावा तसेच दिव्यांगांसाठी फिरती लसीकरण सेवा उपलब्ध व्हावी अशी मागणी ठाणे शहर (जिल्हा)राष्ट्रवादी युवती अध्यक्षा सौ.पल्लवी शिवा जगताप यांनी निवेदनाद्वारे  जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.त्याप्रसंगी कळवा-मुंब्रा युवती अध्यक्षा कु.पुजा शिंदे,कळवा ब्लॅाक युवती कार्याध्यक्षा सौ.श्रुती कोचरेकर उपस्थित होत्या. 

गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड तसेच युवती प्रदेशाध्यक्षा कु.सक्षणाताई सलगर ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे ,प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला,विरोधी पक्ष नेते  शानू पठाण,संघर्ष महिला संघ अध्यक्षा सौ.रूता आव्हाड  यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असल्याचे पल्लवी जगताप यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA