"लोकल" तो अब दूर की बात

   लोकल सर्वांसाठी खुली होईल, ही आशा सध्या तरी मावळली आहे. मुंबईत कोविड रुग्णसंख्येत घट झाली आहे.  मात्र,लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन स्तर ३ चे निर्बंधच मुंबईत कायम ठेवण्यात आले होते. त्यात आता राज्य सरकारने निर्बंधांबाबत संपूर्ण राज्यासाठी नवे आदेश जारी केले असून हे आदेश पाहता मुंबईकरांची लोकल प्रवासाची वाट अधिकच खडतर बनली आहे. . कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना डेल्टा व्हेरिएंट तर ही लाट घेऊन येणार नाही ना, अशी भीती निर्माण होत आहे. यामुळेच कोणताही धोका पत्करायचा नाही, असे सरकारने ठरवले असून त्यातूनच पुन्हा कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल तो अब दूर की बात पहले लॉकडाऊन तो खुले अशी चर्चा प्रवासीवर्गामध्ये होत आहे.

लोकलमधील गर्दी लक्षात घेत महापालिका प्रशासनाने स्तर ३ चे निर्बंधच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. हे निर्बंध एक-दोन आठवड्यांत कमी केले जातील आणि सोबतच सर्वांसाठी लोकलची दारेही खुली केली जातील, ही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची होती.  मात्र राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या आदेशाने मुंबईकरांना आणखी काही काळ लोकलसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या मुंबई उपनगरीय लोकल मधून सध्या केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. अन्य प्रवाशांना लोकल प्रवासास मनाई करण्यात आलेली आहे. 

राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत नव्या आदेशात अनलॉकसाठीचा स्तर १ आणि स्तर २ बाद करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात आता स्तर ३ किंवा त्यापुढच्या स्तरांसाठीचेच निर्बंध लावले जाणार आहेत. राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच नव्या संकटाचे संकेत दिसू लागले आहेत. कोविडच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे राज्यात २१ रुग्ण आढळले असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे केंद्राने याबाबत अॅलर्ट जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही तातडीने कोविड निर्बंधांचे निकष बदलले आहेत. त्यामुळे जे जिल्हे किंवा महापालिका क्षेत्रे सध्या स्तर १ किंवा २ मध्ये आहेत त्यांना अनेक निर्बंध पुन्हा एकदा स्वीकारावे लागणार आहेत. कोविड पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावर मुंबई काही दिवसांपूर्वीच स्तर एकमध्ये दाखल झालीय. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA