ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच होती. महापालिका क्षेत्रात जी बांधकामे अनधिकृतरित्या पूर्ण झाली आहेत आणि तेथे रहिवास सुरु झालेला नाही तसेच निवास सुरु झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत विहीत प्रक्रिया पार पाडून अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुषंगाने शहरात प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील सर्व्हिस रोड, कोलबाड नाका व परिसर, खोपट परिसर, फ्लॉवर व्हॅली सर्व्हिस रोड, विकास कॉम्प्लेक्स रोड, वृन्दावन बस स्थानक, परिसर, कॅसल मिल नाका या परिसरातील रस्त्यावर, पदपथावर अनधिकृतपणे मच्छी विक्री करणाऱ्यावर तसेच पदपथावर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले सामान जागेवरच निष्काशीत करून तसेच अनधिकृतपणे हातगाड्यावर फळ विक्री, भाजीपाला विक्री करणाऱ्यावर सहाय्यक आयुक्त. शंकर पाटोळे साहेब, कार्यालयीन अधीक्षक सुनिता सातपुते यांचे मार्गदर्शनाने अतिक्रमण विभागा मार्फत लिपिक जयराम तारमळे यांनी आज ३० जून रोजी कारवाई करून पदपथ व रस्ते मोकळे करण्यात आले. तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील बाळकूम येथील ३ आरसीसी बांधकाम आणि १ ढाबा जमीनदोस्त करण्यात आला. तर कळवा प्रभागसमितीमधील १ आणि नौपाडा प्रभाग समितीमधील १ आरसीसी बांधकाम निष्कासित करण्यात आले.
0 टिप्पण्या