देशातील जनावरांची जनगणना होत असते परंतु ओबीसींची होत नाही - सुरेश माने

   ठाणे - देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जी काही सरकारं आली त्यापैकी कोणालाही ओबीसी समाजाची जनगणना करावी असे वाटत नाही, त्यांची व्होटबँक तूटण्याची त्यांना भीती वाटते, देशातील  जनावरांची जनगणना होत असते परंतु ओबीसींची होत नाही हा मोठा गहन प्रश्न आहे, असे प्रतिपादन फूलेशाहुआंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत घटनातज्ञ  डॉ.ॲड. सुरेश माने यांनी केले, नवनिर्माण बहुजन फोरमच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश माने बोलत होते, डॉ.आंबेडकर रोड येथील बुद्ध विहार हॉल येथे आयोजित या आरक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी नेते धनाजी सुरोसे होते, 

डॉ.माने मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेल्या अनुसुचित जाती जमाती आरक्षण मंत्री गट समिती चे एससी सदस्यांनी समितीचे राजिनामे द्यायला हवेत, त्यांना विचारले जात नसेल आणि गृहीत धरून अजीत पवार परस्पर पदोन्नती रद्द करण्याची जी आर काढतात तर तूम्ही पदावर राहताच कशाला असा ही सवाल त्यांनी उपस्थित केला, मराठा आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा संशोधनात्मक इतिहास सांगून मोठ्या प्रमाणात होणार्या शेतकरी आत्महत्या त्यांची कारणे, मराठा आरक्षणाची गरज या विषयावर सखोल मार्गदर्शन कायदेतज्ज्ञ डॉ.सुरेश माने यांनी केले,

    ओबीसी नेते धनाजी सुरोसे नवनिर्माण बहुजन फोरमचा उद्देश सांगताना यावेळी म्हणाले की, ओबीसी समाजामध्ये आपला हक्क आणि मौलिक अधिकार या बाबत मोठी उदासिनता दिसून येते, हि जनजागृती करण्यासाठी फोरमच्या माध्यमातून ओबीसी एससी एसटी मायनोरिटी भटक्या विमुक्त समाजाला जोडण्याचे काम हाती घेतले आहे,गेली दहा पंधरा वर्षांपासून ठाणे शहरातील फूले शाहू डॉ आंबेडकरी चळवळीतही मोठी पोकळी निर्माण झाली आहे,नविन तरुणांना पुढे आणले पाहिजे, चळवळीतील कार्यकर्ते चळवळीला पोषक नसलेल्या राजकीय पुढार्यांच्या मागे वेळ वाया घालवत आहेत, बहुजन समाजातील सर्व घटकांना एकत्र करून भविष्यातील सामाजिक, राजकीय घडामोडीतून बहुजन चळवळीच्या हातात काही चांगलं  यश यायला हवे, त्यासाठी हा फोरम काम करणार आहे,

   डॉ.सुरेश माने यांनी दिप प्रज्वलन करून परिषदेला सुरुवात केली, जेष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर, ओबीसी विचारवंत राजाराम ढोलम, डॉ.विजय पवार यांनीही यावेळी आपले विचार मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते राहुल कांबळे यांनी केले, उपस्थित जेष्ठ मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, या आरक्षण परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी निमंत्रक जयंत किर्तने, ॲड.सचिन कांबळे, जस्टिन राजू, बालाजी मसुरे यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA