Trending

6/recent/ticker-posts

व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेशाकरिता जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेण्याचं आवाहन


 वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेणे गरजेचे आहे. यासाठी 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांनी विहीत कालमर्यादेत जमात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

कोकण प्रशासकीय विभागातील वैद्यकीय अभियांत्रिकी आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी एसटी राखीव जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांचे जमात पडताळणी कार्यवाही विहीत कालमर्यादेत पूर्तता करण्याचा निर्णय समितीद्वारे घेण्यांत आलेला आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा जमात दावा पडताळणी प्रस्ताव ठाणे येथील समिती कार्यालयास सादर केला असेल तर त्यासंदर्भात पुढील पडताळणी कार्यवाही करण्यासाठी त्यांनी त्यांचे नाव पत्ता आणि इतर आवश्यक माहितीसह विनंती अर्ज या कार्यालयाचे ई-मेल आयडी tcscthane@yahoo.com वर सादर करावा. विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांचे प्रवेशाची कार्यवाही विहीत वेळेत पुर्ण व्हावी असे आवाहन कोकण विभागाच्या सहआयुक्तांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या