गायकवाड परिवाराकडून गरजू कुटुंबियांना वर्षभरापासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 सुनील गायकवाड व  मंगला गायकवाड समाजसेवेशी समर्पित  कुटुंब
गरजू कुटुंबियांना  वर्षभरापासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

   आपल्या समाजसेवेची प्रसिध्दी करून प्रसिध्दीलोलुप पुढारी त्याचा जगभरात गवगवा करताना दिसतात परंतु मागील वर्षभरापासून  प्रसिध्दीपासून  अलिप्त राहून समाजातील गरजू व उपेक्षित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणारे कुटुंब म्हणजे सुनीलभाऊ गायकवाड व मंगलाताई गायकवाड हे आहेत.लाॅकडाऊन मुळे अडचणीत सापडलेल्या 500 च्यावर  गरजू कुटुंबांना गायकवाड कुटुंबिय कोणतीही अपेक्षा न ठेवता मालाड पूर्व शाह आर्केड येथील लुंबिनी बुध्द विहार येथे  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत.

मागील वर्षभरापासून त्यांनी विविध जातीधर्मातील गरजू कुटुंबियांना प्रतीमहीना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करीत आहेत.  सोबतच या गरजू कुटुंबियांच्या ईतर कौटुंबिक  समस्या सोडविण्याचे  कामदेखील हे पती पत्नी करीत आहेत.सुनीलभाऊ गायकवाड हे भीम आर्मी या संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष असून त्यांची पत्नी मंगलाताई गायकवाड या भीम आर्मीच्या माजी कोषाध्यक्षा तसेच  गुलमोहर सोशल फाऊंडेशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. वर्षभरापासून चाललेले त्यांचे हे कार्य यावर्षी सुध्दा विनासायास खंड पडू न देता सुरूच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या