देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार ?

     नवी दिल्लीः  देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार ? यावरून तज्ज्ञांकडून वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.  यापूर्वी कोविड वर्किंग ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी रविवारी करोनाची तिसरी लाट ही ६ ते ८ महिन्यांत येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता.  मात्र  कोरोनाची तिसरी लाट कधी येणार याची निश्चित तारीख सांगणं योग्य नाही. व्हायरसचे वर्तन अनिश्चित आहे. एक अनुशासित आणि प्रभावी प्रक्रियाच ही संभाव्य लाट रोखता येऊ शकते.  व्हायरसचा अनिश्चित व्यवहारही महामारीची दशा-दिशा बदलू शकतो, तिसरी लाट नक्की कधी येईल याबाबतची तारीख सध्यातरी स्पष्ट करता येणार नाही, असं  कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष निती आयोगाचे (आरोग्य) सदस्य असलेल्या डॉ. व्ही. के. पॉल  यांनी तिसरी लाट कधी यावर उत्तर दिलं आहे  तिसऱ्या लाटेसंबंधी केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्याता नसल्याने संभ्रम आणखी वाढला आहे.

व्हायरसच्या कुठल्याही लाटेचा प्रसार हा अनेक पैलूंवर अवलंबून असतो. म्हणजे कोविडशी संबंधी शिस्त, चाचण्या आणि कंटेन्मेंट झोन बनवण्याचं धोरण आणि लसीकरणाचा वेग हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. डेल्टा प्लस वेरियंट हा अधिक संसर्गजन्य आणि त्यावर लसी फारशा प्रभावी नाहीत, याचा कुठलाही पुरवा नाहीए. डेल्टा प्लस वेरियंट हा डेल्टाचे म्युटेशन आहे. या डेल्टा प्लस वेरियंट बाबत सध्या प्राथमिक माहिती आहे. हा वेरियंट अधिक संसर्गजन्य आहे? या वेरियंटने रुग्ण गंभीर होण्याचा धोका अधिक आहे का? किंवा लसींचा प्रभाव की होतो का? यासंदर्भात कुठलेही पुरावे नाहीत, भारताच्या कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळण्याची प्रक्रिया उत्तम प्रकारे सुरू आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. फायजर आणि मॉडर्नाच्या करोनावरील लसींनाही देशात लवकरच मंजुरी मिळेल असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या