Top Post Ad

कडक निर्बंध - व्यापाऱ्यांचा विरोध

  मुंबई : कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ, डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारने पुन्हा निर्बंध अधिक कडक केले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमावाली  राज्यात कुठेही लागू करता येणार नाही. सर्व जिल्ह्यांना तसेच महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आजपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  अत्यावशक सेवा आणि दुकानं उघडण्याला परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी कोल्हापूरमध्ये व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत काहीही केलं तरी दुकानं उघडणार असल्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे दुकानं उघडल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे व्यापारी संघटना संतापल्या असल्याने दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूरमधील व्यापारीवर्ग  आपली दुकाने उघडी ठेवणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे व्यापारी विरुद्ध प्रशासन असा वाद वाढण्याची शक्यता आहे. तसेच नागपूरमध्येही व्यापारी संघटनांनी आक्रमक निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. आजपासून बाजारपेठा हे ४ वाजेपर्यंतच खुल्या असणार आहेत. त्यामुळे व्यापारीवर्ग प्रचंड संतापला आहे.  नागपूरमध्ये महापालिका व जिल्हा प्रशासनाने बाजारपेठा खुल्या ठेवण्यासंबंधी नव्याने नियमावली जारी केली आहे. यानुसार आता पुन्हा एकदा सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह अत्यावश्यक नसलेल्या सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. तर शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांचीच दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. शहरातील निर्बंध काहीच दिवसांपूर्वी शिथिल करण्यात आल्याने बाजारपेठा रात्री ८ तर हॉटेले-रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होते. दरम्यान, हॉटेलमधून पार्सल सुविधा दुपारी ४ वाजेनंतरही सुरू राहणार आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता  डेल्टा प्लसचा धोका वाढू लागलाय. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध वाढवले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी वाढली आहे, दुसरी लाट पुन्हा उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणं हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील,'  दुसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता 'पुढच्यास ठेस, मागचा शहाणा' या म्हणीप्रमाणं आपल्याला आधीच काळजी घ्यावी लागेल,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.  मालाड इथल्या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, 'सध्या आपल्याकडं कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे,” असं सांगत मुख्यमंत्र्यांनी गर्दी करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com