आदिवासी भागात प्रभातफेरी काढून लसीकरण जनजागृती

आदिवासी दुर्गम भागात प्रभातफेरी काढून जनजागृती केल्याने
साकडबाव उपकेंद्रावर झाले लसीकरण शंभर टक्के यशस्वी

   शहापूर तहसीलपासून ३२ किलोमीटर अंतरावर आदिवासी अतिदुर्गम भागात असलेल्या साकडबाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर मंगळवारी येथील नागरिकांनी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले अशी माहिती जिल्हा परिषद केंद्रशाळा साकडबाव मुख्याध्यापक संभू  कोकाटे यांनी दिली.

   साकडबाव येथे लसीकरण करण्यापूर्वी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संबहु एम.पी.डब्लू वर्कर रिकामे ,आशा वर्कर  रंजना  चौधरी, ग्रामपंचायत  लिपिक  विश्वास  चौधरी, ऑपरेटर  नितीन चौधरी, ग्रामसेवक  तरवारे विकास चौधरी यांनी प्रथम गावातून लोकांना जागृत करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करून जनजागृती केली. त्यामुळे गावातील लसीकरणाचे उद्दिष्ट  १०० %  पूर्ण झाले असून एकूण १५५ ग्रामस्थांनी लसीकरण करून घेतले आहे.  परंतु साकडबाव परिसरातील  पायरवाडी, पारधवाडी ,पाचरवाडी, जुणवणी, बाबरेवाडी, पोकळेवाडी, जळकेवाडी, या पाड्यातील ग्रामस्थांनी लसीकरणाला अल्प प्रतिसाद दिला असल्याचे देखील कोकाटे यांनी सांगितले. लसीकरण कामी ड़ॉ. हर्षल भोरे  शुभांगी अडणे सिस्टर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच यावेळी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने अल्पोउपहाराची व  वाहतुकीची व्यवस्था केली होती.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA