मुंबई
विश्वाला शांतीचा संदेश देणारे, विश्ववंदणीय, महाकारूणीक, तथागत, भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आज बुधवार दिनांक २६ मे २०२१ रोजी प्रज्ञा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सायन (शीव) येथे मोठ्या उल्हासात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विभागातील सर्व मान्यवर , उपासक-उपासिका संस्थेचे पदाधिकारी, महिला वर्ग यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर विभागातील नागरिकांना खिरदान करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. शिवसेना महीला उपविभाग संघंटक माया जाधव यांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द ह्याच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. बौ.प.शा.क्रं २९२ चे माजी अध्यक्ष एस.व्ही.मोहिते ह्याच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तर अॅड.अक्रम खान ह्याच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्या प्रतिमेस पुष्प हार घालण्यात आला. प्रणाली सेवाभावी महिला असोशिएनच्या अध्यक्षा गौतमी जाधव ह्याच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन कु.अपर्णा अनिल कासारे हिच्या मधुर वाणीने सामुहिक बुध्दवंदना पुजापाठ घेण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक प्रज्ञा प्रतिष्ठानचे खजिनदार नितिन दिवेकर ह्यानी केले
शिवसेना गुजरात संपर्कप्रमुख कमलेश वारिया, धारावी विभाग संघटक विठ्ठल पवार, मनसे वाहतुक धारावी अध्यक्ष शकील खान ,वंचित बहुजन आघाडीचे मुबंई प्रदेश प्रभारी बी.आर.मर्चंडे, माजी जिल्हा उपसचिव शरीफ खान, वृत्तसंग्राम वर्तमानपत्राचे संपादक विलास शंभरकर, दै.उत्तरशक्तीचे ठाणे प्रतिनिधी रमेश तायडे यांच्यासह मनसे वाहतुक उपसंघटक युसुफ खान, मनसे १८३ शाखा अध्यक्ष संदिप कवडे, मनसे विद्यार्थि सघटना धारावी अध्यक्ष जीगर मोरे, रूतिक कासारे, प्रशांत शिर्के, शिवसेना वाहतुक सेना मुबंई सचिव कल्पेश भितळे, भाजप माजी उपतालुका अध्यक्ष नवाब साजीद शेख, रिपाई बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हा अध्यक्ष आश्विन वाघ, वंचित बहुजन आघाडीचे धारावी विधानसभा अध्यक्ष विनोद जैयस्वार, जिल्हा सचिव इकबाल मनिय्यार, प्रज्ञा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मुकेश दिवेकर सत्येन छेडा, विकासक नासीरभाई, लक्ष्मी कावळे आणि संस्थेचे सरचिटणीस तथा प्रजासत्ताक जनताचे संपादक सुबोध शाक्यरत्न यांच्यासह अनेक संस्था संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तृप्ती दिवेकर, विनीत कासारे, वैभव जाधव, अलिशा कासारे, विशाखा जाधव आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या