बहुजनांच्या उरावर बसलाय शासक वर्ग


 तृणमूल कॉंग्रेस’ला शुभेच्छा देताना बहुजनांच्या उरावर बसलाय शासक वर्ग बामणच..!

पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत २९२ जागांपैकी २१३ जागा तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत. बंगालच्या जखमी वाघिणीने भाजपाला हरवले, एकहाती वाघिण जिंकली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. 

पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत २९२ जागांपैकी २१३ जागा तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत. बंगालच्या जखमी वाघिणीने भाजपाला हरवले, एकहाती वाघिण जिंकली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. बरं प्रतिक्रिया देणारे सारेच बहुजन राजकारणी आहेत. त्यांची नावे घेणार नाही. त्यांनी भरभरून अभिनंद केले आहे. राजकारणी लोकांना राजकारण करायचं आहे, त्यांना बामणांच्या गुलामीशी काहीच संबंध नाही, म्हणून ते कुठल्याही प्रकारे विचार न करता प्रतिक्रिया देतात. 

फक्त भाजपाला हरवली ना... हरवली कुठे केवळ तीन जागा असलेल्या भाजपच्या आज ७५ जागा झाल्या. म्हणजे तुम्ही भाजपाच्या विरोधात आहात असा त्यांचा होरा असतो. परंतु भाजपा काय अथवा कॉंग्रेस काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे बहुजन समाजातील नेतृत्वाच्या लक्षातच येत नाही, लक्षात आले तरी जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा करतात. म्हणून आज ८५ टक्के मूलनिवासी बहुजनांचा एकही राष्ट्रीय पक्ष नाही. परंतु डीएनएनुसार विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणांचे पाच-पाच राष्ट्रीय पक्ष आहेत. खरं म्हणजे लोकशाहीत अल्पसंख्य बामण शासक वर्ग होऊ शकत नाही. परंतु भारतात ते आहे. लोकशाहीचा सिद्धांत असा आहे कुठल्याही देशाची सत्ता ही बहुसंख्य लोकांच्या हातात असायला हवी. काय भारताची सत्ता बहुसंख्य असलेल्या ८५ टक्के लोकांच्या ताब्यात आहे का? याचे उत्तर नाही.

आता आपण राजकीय पक्षांबाबत बोलू. कॉंग्रेसची स्थापना २८ डिसेंबर, १८८५ मध्ये चॅटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, टिळक, आगरकर या बामणांनी केली. भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना २६ डिसेंबर,  १९२५ रोजी श्रीपाद अमृत डांगे या बामणांनी केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना ७ नोव्हेंबर,  १९६४ मध्ये इ.एम.एस.नंबुद्रीपाद यांनी केली. ते केरळातील बामण होते.  भारतीय जनता पार्टीची स्थापना ६ एप्रिल, १९८० मध्ये अटलबिहारी वाजपेयी या बामणानी केली. लालकृष्ण अडवाणी हेदेखील भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी आहेत. 

तृणमूल कॉंग्रेसची स्थापना १ जानेवारी १९९८, मध्ये ममता बॅनर्जी यांनी केली. त्या देखील बामण कम्युनिटीतून येतात. विशेष म्हणजे तृणमूलचा अर्थ बामण, क्षत्रिय, वैश्य असा आहे. म्हणजे तृणमूलदेखील उच्चवर्णीयांची राजकीय पार्टी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बामणानी स्थापन केलेले ५ राजकीय पक्ष हे राष्ट्रीय आहेत. देशात ६० प्रादेशिक पक्ष आहेत. १७८६ राजकीय पक्षांची नोंदणी आहे. एकतरी बहुजनांचा राजकीय पक्ष राष्ट्रीय स्तरावर आहे का? याचे उत्तर आजच्या घडीला तरी नाही. मान्यवर कांशीराम साहेब असताना बहुजन समाज पार्टी व राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने तुमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता का काढू नये अशा प्रकारचे पत्र पाठवून निवडणूक आयोगाने विचारले होते. म्हणजे बहुजन समाज पार्टी व राष्ट्रवादी कॉंग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कशी मिळते याचा विचार केला तर विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीतकमी ६ टक्के मते मिळाली पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत कमीतकमी ४ जागा मिळायल्या हव्यात अथवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीतकमी २ टक्के जागा मिळाल्या पाहिजेत. या जागा कमीतकमी ३ राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत. किंवा त्या पक्षाला कमीतकमी ४ राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर फायदेही आहेत. त्यांना राखीव निवडणूक चिन्ह, पक्षाच्या कार्यालयासाठी जमीन, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर मोफत प्रक्षेपण, निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचे मोफत वितरण करण्यात येते.

पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसला सत्ता मिळाल्याने बहुजन समाजातील राजकीय नेते व एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, मानयॉरिटीमधील लोकांनी ममता बॅनर्जींचे तोंड भरून कौतुक केले आहे. बंगालची वाघिणी एकटी लढली अशा प्रकारे बहुजन समाजातील नेत्यांनी व लोकांनी ढोल बडवला. काय पश्‍चिम बंगालची सत्ता बहुजनांच्या ताब्यात आली. त्याचे उत्तर नाही. देशातील अनेक राज्यात कॉंग्रेस, भाजपा, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, तृणमूल कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांची सत्ता आहे. राजकीय पक्षांची केवळ नावे बदलली आहेत. शासक वर्ग बामणच आहे. कारण या पक्षांची स्थापनाच बामणांनी केलेली आहे.

देशाच्या राजकारणाचा विचार करता हे सर्वप्रथम लक्षात आले होते राजर्षी शाहू महाराज व  विश्‍वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या. त्यामुळे त्यांनी बहुजनांचा राजकीय पक्ष असावा म्हणून त्यादृष्टीने आखणीही केली होती. परंतु शाहू महाराजांच्या संशयास्पद मृत्यूने हा विषय बाजूला पडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष होता. त्याची त्यांनी घटनाही तयार केली होती. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ ला परिनिर्वाण झाले. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना ३ ऑक्टोबर, १९५७ रोजी करण्यात आली. त्याचे पहिले अध्यक्ष एन.शिवराज होते.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे नावच ‘भारतीय प्रजासत्ताक पक्ष’ असे आहे. काय आज जे स्वत:ला ‘रिपब्लिकन’ समजतात त्यामध्ये भारतीय प्रजा आहे का? भारतीय प्रजा म्हणजे एस.सी.मधील १७०० जातींपैकी केवळ बौद्धांना घेऊन राजकारण करता येणार आहे का? आज तर अनेक गट-तट निर्माण करण्यात आले आहेत. ही सर्व राजनीती बहुजननायक कांशीराम यांच्या लक्षात आली होती. म्हणून त्यांनी देशातील सर्वात मोठे राज्य असलेले उत्तर प्रदेशात आपला मोर्चा वळवला. त्यांनी राजनीती यशस्वी करून दाखवली. १४ एप्रिल, १९८४ रोजी बहुजन समाज पार्टीची स्थापना करत त्यांनी देशातील राजकीय चित्र बदलवून टाकले होते. 

‘शासनकर्ती जमात बना’ असा संदेश बाबासाहेबांनी दिला होता. त्यांचा विचार खर्‍या अर्थाने मान्यवर कांशीराम यांनी खरा करून दाखवला होता. एक-दोनदा नव्हे तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यात तीनवेळा सत्ता स्थापन केली होती. हाच ८५ टक्के बहुजनांचा विचार सार्‍या देशात पसरला तर आपल्याला चंबुगबाळे गुंडाळावे लागेल, म्हणून बामणी व्यवस्था सतर्क झाली आणि त्यांनी जगातील प्रगत राष्ट्रांनी नाकारलेले ईव्हीएम भारतात आणण्याचा निर्णय घेतला. कारण त्याच कालखंडात ‘वोट हमारा राज तुम्हारा नही चलेगा, नही चलेगा’ असा नारा कांशीराम यांनी दिला होता. ईव्हीएम आणण्याचा प्रस्ताव  १९८४ मध्ये पारित करण्यात आला. इंदिरा गांधी त्यावेळी प्रधानमंत्री होत्या. हा प्रस्ताव कॉंग्रेसच्या अभिषेक मनुसंघवी यांनी ठेवला. त्याला पाठिंबा त्यावेळी भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी, कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांनी दिला. 

म्हणजे बामण कुठल्याही पक्षात असो तो स्वत:च्या जातीसाठी मरत असतो. वेगवेगळ्या पक्षात असलेले बामण ईव्हीएम आणण्यासाठी एकत्र आले होते. म्हणजे त्यांनी डावपेच बदलला होता, उद्देश मात्र एकच होता तो म्हणजे बहुजनांचे राजकीय पक्ष सत्तेत येता कामा नयेत. आज त्याच ईव्हीएममध्ये खुलेआम घोटाळा करून कधी कॉंग्रेस तर कधी भाजपा देशाची सत्ता ताब्यात घेतात, याचा अर्थ शासक वर्ग हा बामणच राहतो. आज देशभरात याच दोन राजकीय पक्षांची सत्ता आहे. म्हणून समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.

 पूर्वीच्या राजेशाहीचे लोकशाहीत रूपांतर झाल्यानंतर लोकशाहीची विभागणी चार भागात करण्यात आली. कायदेमंडळ (संसद), कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रचार व प्रसामाध्यमे. लोकशाहीच्या चारही स्तंभावर ३.५ टक्के अल्पसंख्य विदेशी ब्राम्हणांनी निरंकुश वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे भारतात लोकशाही आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. भारतात  केव्हाच बामणशाही निर्माण झाली आहे. हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ‘हिंदू’ नावाच्या खोट्या धर्माचे लेबल लावले जाते.  मग एससी, एसटी, ओबीसी ‘हिंदू’ या नावाखाली बामणालाच मोठे करण्याचा प्रयत्न करतो. ही वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर तोंड फाटेस्तोवर उर बडवून घेणारे बहुजन नेते व बहुजनांनी तुमच्या उरावर शासक वर्ग म्हणून बामणच बसला आहे हे लक्षात ठेवा. कारण समाज व्यवस्थेत आजही सर्वोच्चस्थानी बामण आहे. मग बाकी सारे आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्याशिवाय बहुजनांची राजनीती यशस्वी होणार नाही.

Published On :    3 May 2021  By :  एम.एन.न्यूज व्दारा प्रकाशित .

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad