इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था -
ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण
ठाणे मनपाचे शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांचा पुढाकार

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेतर्फे केलेल्या या मदतीमध्ये ३ व्हेंटिलेटर मशीन्स, १५ ऑक्सिजन सिलेंडर आणि १५ ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर देण्यात आले आहेत. ही मदत ठाणे महानगरपालिकेने उभ्या केलेल्या ग्लोबल आणि पार्कींग प्लाझा कोविड केअर सेंटरमध्ये वापरली जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या वैद्यकीय उपकरणांसोबत दिलेल्या मदतीमधील 15 ऑक्सिजन सिलेंडर रिकामे झाल्यावर संस्थेमार्फतच ते पुन्हा रिफिल करण्यात येणार आहेत. त्यामुळे तो भुर्दंड देखील पालिकेवर पडणार नसल्याचे योगेश जानकर यांनी स्पष्ट केले आहे.
0 टिप्पण्या