ठाण्यातील नालंदा बुद्ध विहार कळवा, येथील बौद्ध विकास मंडळ कमीटीने कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर समाजातील गरजवंताकरिता कोरोना रिलीफ फंडात धम्मदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सभासदांनी ऊस्फुर्त प्रतिसाद दिल्याने कोरोना रिलीफ फंडात रू.६५००१/-( रूपये,पासष्ठ हजार एक) धम्मदान जमा झाले. बुद्ध जयंतीचे औचित्य साधून ठरवल्यानुसार अत्यंत गरजू अशा सभासदाला म्हणजेच ज्या कुटुंब प्रमुखाचे अकाली निधन झाले असून ते कुटुंब निराधार झाले आहे अशांना मदतीचा हात पुढे करण्याचे मंडळाचे धोरण होते.
त्यानुसार मंडळाचे युवा दिवंगत सभासद कालकथीत, संजय शेलार यांच्या पत्नी ऊपासीका साक्षी शेलार यांना त्यांच्या घरी जाऊन अत्यंत भावूक अशा अंतःकरणाने मंडळाचे अध्यक्ष आयु. बी जे कांबळे यांच्या हस्ते ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. त्यासोबत मंडळाच्या वतीने त्यांना अत्यंत दुःखीत भावनेने एक साडीही भेट देण्यात आली. यावेळी मंडळाचे सचिव आयु.चंद्रकांत गरूड, चंद्रकांत रोकडे, अनिल जाधव, निलेश उबाळे, प्रशांत घोलप, बाळा भालेराव आणि किशोर बनकर साहेब उपस्थित होते. मंडळाच्या सर्व सभासदांनी मनापासून कोरोना रिलीफ फंडात धम्मदान केल्यामुळे हे शक्य झाले असून मंडळाचे अध्यक्ष बी.जे.कांबळे यांनी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या