Trending

6/recent/ticker-posts

स्वतःची ओळख पूसलेला ओबीसी समाज आता जागृत होत आहे-आबासाहेब चासकर

ठाणे 
 बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ठाणे पूर्व कोपरी येथील श्रमदान सोसायटीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बौद्ध धम्मप्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक शंकर बुकाणे होते. सुत्रसंचलन लक्ष्मण बनकर यांनी केले, या प्रसंगी प्रवचनकार आबासाहेब चासकर यांनी यावेळी बुद्ध चरीत्र भाग एक मधिल सिद्धार्थ गौतमाचा जन्म ते संबोधि (बुद्धत्व) प्राप्ती पर्यंत ची संपूर्ण माहिती उपस्थित उपासक उपासिकांना दिली, 

आपल्या प्रवचनात ते म्हणाले,  बुद्धाने आपल्या जगण्यात थोडी देखिल लबाडी खपवून घेतलेली नाही,खोटेपणाला शिरकाव करायला आपल्या जीवन चरीत्रात  बुद्धाने जराशीही जागा मिळू दिली नाही, आज या नविन विज्ञान युगामुळे व्हाट्सअप च्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला काय चालले आहे ते लगेच कळते, आज माझ्या वाचनात आले की, ओबीसी समाजाचे नेते धनाजी सुरोसे यांनी ब्यानर बनवून त्यात लिहिले आहे की, ओबीसींचे मुळ व कुळ गौतम बुद्ध, यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा, 

 तसेच ओबीसी विचारवंत नेते राजाराम ढोलम यांनी आपल्या घरात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्ध वंदना घेऊन कुटुंबासमवेत बुद्ध तत्वज्ञान स्विकारले असल्याचे ओबीसी समाजाला प्रत्यक्ष दाखवून दिले, समाजाने वेळ वाया जाऊ न देता बुद्ध तत्त्वज्ञानाचेच अनुसरण करावे, असे आवाहन त्यांनी केले, त्यामुळे व्यवस्थेच्या लबाडीने आतापर्यंत आपली स्वतःची ओळख पूसलेला ओबीसी समाज आता जागृती होत आहे, आणि आपली खरी ओळख समजून घेत आहेत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे तूम्हा आम्हाला तर आयतेच मिळालेले बुद्ध समजून घ्या, लहानपणापासून मुलांना आपल्या महापुरुषांचे महान विचार समजून सांगा अशी अपेक्षा चासकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments