छत्रपती संभाजी महाराज यांचा अंतिम संस्कार हे गणपत महारांनी केलेला आहे पण काही जातीवादी गावगुंडांनी संभाजी महाराजांच्या समाधीजवळ एक शिवले पाटील याच्या नावाचा एक बोर्ड लावला आहे की संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार त्या शिवले पाटलांनी केलाय. यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. खरा इतिहास काही सनातनी जातीवादी गावगुंड पुसत आहेत. एवढे महान कार्य करणाऱ्या व्यक्तीचा इतिहास संपविण्याचा प्रयत्न होत असल्याने या विरोधात प्रत्येकाने संघटीतपणे आंदोलन केले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी राजे यांचे शेवटचे संस्कार करणारे गणपत महार हेच व्यक्ती आहेत. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाने संभाजीला तुरूंगात टाकले व त्याला ठार मारले. यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. मात्र औरंगजेबाच्या भीतीने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आल्यानंतर गणपत महार पुढे आला आणि संभाजी राजे यांचे अंतिम संस्कार केले. त्यांनी छत्रपती संभाजी राजेंसाठी स्वत: च्या हातांनी समाधी बनविली. आजही ही समाधी महारवाड्यात आहे. गणपतच्या निधनानंतर त्यांची समाधी देखील संभाजीराजे यांच्या समाधीजवळ बांधली गेली.
मात्र गणपत महार यांचे नाव संभाजी राजे यांच्याशी जोडण्याचा राग काही गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये अद्याप आहे. मागील अनेक वर्षापासून हा वाद कायम स्वरूपी चिघळत ठेवला. ज्याप्रमाणे दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नसताना त्यांना गुरुस्थानी बसवले त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक गणपत महार यांचे मोठेपण नाकारण्याकरिता हा सारा खटाटोप काही नतभ्रष्ट मंडळी करीत आहेत. वढू बुदूरक येथे स्थित गणपत महारच्या पुतळ्याची हानी केल्याप्रकरणी ४९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याबाबत अद्यापही कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर हळू हळू येथील गावगुंडांनी गणपत महाराचा इतिहास पुसण्यास गमिनीकाव्याने सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय आता दिसून येत आहे. याबाबत तात्काळ शासनाने लक्ष घालून खऱ्या इतिहासाचे जतन करणे गरजेचे आहे.
खरा इतिहास जाणून घ्या
https://mr.wikipedia.org/wiki/चर्चा:गोविंद_गोपाळ_गायकवाड
0 टिप्पण्या