Top Post Ad

आरक्षणासाठी राज्यकर्त्यांची इच्छा हवी

 

  संभाजीराजे भोसले यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, "शरद पवारांचं राजकारण 40 वर्षं बघतोय, ते नरो-वा कुंजरो वा असं करतात. पण, सगळ्याच विषयात असं करून चालत नाही. ते आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेत नाहीत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. आपण अपेक्षा करूया ते काहीतरी भूमिका घेतील. आरक्षण हे अॅडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल होत आहे, पण इथला राज्यकर्ते ते मानायला तयार नाही. येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा त्रासदायकच होईल असं नव्हे तर काहीवेळा राज्यसत्ता चालवायला अडचण येईल अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, आरक्षणासाठी राज्यकर्त्यांची इच्छा हवी होती. रिव्ह्यू पिटीशन नाही तर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींमार्फत हे करायला हवं. राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून पुनर्विचार याचिका करू शकतो. राज्यसत्तेशिवाय हे होणं अशक्य आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजे यांच्याबरोबर जायला तयार म्हणूनच त्यांच्यासोबत इथं बसलोय," असंही ते पुढे म्हणाले.

या पत्रकार परिषदेत संभाजीराजे भोसले म्हणाले, "गायकवाड समितीचा अहवाल त्रुटी भरून काढाव्या लागतील, परिस्थिती प्रतिकूल, प्रयत्न करू. लवकरात लवकर दिल्लीत गोलमोज परिषद घेऊ. त्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सगळे खासदार यांना बोलावणार. उदयनराजे आणि मी वेगळा नाही, भेटायला काहीच अडचण नाही, असंही ते पुढे म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com