Top Post Ad

श्रमजीवी संघटनेच्या बाल कोविड रुग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


वसई - पालघर जिल्ह्यातील उसगाव डोंगरी येथे श्रमजीवी संघटनेच्या विधायक संसद या उपक्रमातून बाल कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. तसेच या भागातील ग्रामीण आदिवासी रुग्णांना कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १०० बेड्सच्या रुग्णालयाचे तसेच लहान मुलांसाठीच्या कोविड रुग्णालयाचे  उद्घाटन मत नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पार पडले .  यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक  विवेक पंडित, स्थानिक खासदार डॉ. राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा तसेच कोविड केंद्रात उपचार करणारे डॉ. वर्षा आणि डॉ. राजेश भोसले यांच्यासह श्रमजीवी संघटनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.  

 उद्घाटन प्रसंगी बोलतांना शिंदे यांनी  राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आपण आधीपासूनच सज्ज रहायला हवे, असे मत व्यक्त केले.  कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जेव्हा दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यानंतर बेडची कमतरता,  रेमडेसीवीरचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमतरता इत्यादी गोष्टीची कमतरता सर्वत्र भासू लागली. परंतु, पूर्णपणे सरकारवर अवलंबून न राहता काही समाजसेवी संस्था आणि संघटना मदतीसाठी पुढे आल्या आणि त्यांनी स्वतःची सामाजिक जबाबदारी ओळखून लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. सध्या कोरोनाचे संकट ओसरत आहे असे वाटत असतानाच म्युकरमायकोसिस सारखे नवीन आजार उद्भवू लागले आहेत. या आजारांना तोंड द्यायचे असेल तर आपल्याला आतापासून तयारी करून ठेवणे आवश्यक असल्याचे  शिंदे यांनी यावेळी सांगितले.

श्रमजीवी संघटनेचे सर्वेसर्वा विवेक पंडित यांनी यावेळी पालकमंत्री  शिंदे यांचे विशेष आभार मानले. ज्या ज्या वेळी जी गरज लागेल ती करण्यासाठी पालकमंत्री शिंदे कायम आमच्यासोबत ठामपणे उभे असतात. त्यांच्या सहकार्यामुळेच हे बाल कोविड केंद्र आणि रुग्णालय उभारण्याची झेप घेणे शक्य झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या बाल कोरोना रुग्णालयाला 2 व्हेंटिलेटर्सची भेट देत असल्याची घोषणा यावेळी केली. या बाल कोरोना रुग्णालयात एकूण १० बेड्स असून त्यापैकी ८ ऑक्सिजन बेड्स आणि २ व्हेंटिलेटर्स बेड्सची सोय करण्यात आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com